भरपावसात पावनखिंड येथे घेतली हिंदु राष्ट्राची शपथ !
कोल्हापूर – पावनखिंड येथे हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली. या वेळी बोलतांना श्री. सुनील घनवट म्हणाले, स्वातंत्र्य हे आपल्याला कोणी भेट म्हणून दिलेले नाही किंवा झोळीत टाकलेले नाही, त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्रही कोणी भेट देणार नाही, तर ते लढूनच मिळवावे लागेल. शूर वीर मावळे, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या बलिदानामुळेच आपण स्वत:ची ओळख हिंदु म्हणून करून देत आहोत. येणार्या पिढीने जर आपल्याला विचारले तुम्ही आमच्यासाठी काय केले, तर आपल्याकडे काय उत्तर असेल, याचा विचार आजच करावा लागेल. आपले आदर्श चित्रपट सृष्टीतील खानावळ ठेवण्याऐजवी भगतसिंग, सुखदेव, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद हे असले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केले, त्याचप्रमाणे आपल्यासमवेत येणार्या मूठभर लोकांना घेऊनच हिंदु राष्ट्र स्थापन करावे लागेल.
या वेळी वीर शिवा काशिद यांचे १३ वे वंशज श्री. आनंदराव काशीद, अनिकेत हिरवे, मधुकर कोरे, के.डी.सी.सी.चे संचालक श्री. सर्जेराव पाटील, भाजपचे श्री. सुरेश पटेल, श्री. चारुदत्त पोतदार, जितेंद्र पंडित, रमेश पडवळ, रत्नागिरी येथील श्री. महेश मयेकर यांसह २५० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात