Menu Close

केरळ : इस्लामचा प्रचार करणा-या संस्थेत रहाणा-या हिंदु मुलीला जबरदस्ती मुसलमान बनविल्याचा आरोप

इस्लामचा प्रचार करण्याच्या नावाखाली धर्मांतरण करणा-या अशा संस्थेवर त्वरित कार्यवाही व्हावी आणि संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे – संपादक, हिन्दूजागृति

namaz_offering

तिरुअनंतपुरम (केरळ) – केरळमधील हिंदू तरुणी निमिषा उर्फ फातिमाच्या धर्मांतराचे प्रकरण चर्चेत असतानाच जबरदस्तीने मुसलमान बनवल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कोच्चीमध्ये अॅरोनॉटिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेणाऱ्या अपर्णा विजयन या तरुणीला जबरदस्तीनं मुसलमान बनवण्यात आल्याची तक्रार तिरुवअनंतपुरम येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

अपर्णाची आई मिनी यांनीच ही तक्रार दाखल केली आहे. ‘अपर्णा ही ऑगस्ट २०१३ पासून एर्नाकुलमच्या जुएल एज्युकेशनल ट्रस्टमध्ये शिकत होती. तिथे ती एका हॉस्टेलवर राहात होती. याच दरम्यान काही जणांनी तिला जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावला. तिचे नाव बदलून ‘शहाना’ ठेवले,’ असं मिनी यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

‘अपर्णा सध्या इस्लामचा प्रचार-प्रसार करणाऱ्या ‘सथ्य सारनी’ संस्थेजवळ राहते. आधी ती माझ्या संपर्कात होती आणि तिला जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करायला लावल्याचं तिनेच मला सांगितले होते. पण निमिषाचे प्रकरण उजेडात आल्यानंतर तिने माझ्याशी बोलणेच सोडून दिले आहे’, असे मिनी यांनी मीडियाला सांगितले.

मिनी विजयन यांनी या प्रकरणी तक्रार करताच पोलिसांनी कोझिकोडे येथून अपर्णाला ताब्यात घेतलं आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयात मात्र अपर्णाने पुन्हा हिंदू होण्यास नकार दिला. ‘मी सुमय्यासोबत आले असून तिच्यासोबतच परत जायचं आहे, असे तिने सांगितले. त्यामुळे तिच्या आईला धक्का बसला. (हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्याचा हा परिणाम आहे. – संपादक, हिंदुजागृति)

स्त्रोत : सकाळ

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *