Menu Close

जर्मनीत अल्पवयीन धर्मांध तरुणाचा कु-हाडीने ट्रेन प्रवाशांवर हल्ला !

बर्लिन : दक्षिण जर्मनीत एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने ट्रेनमधील प्रवाशांवर हल्ला केला. कु-हाड आणि चाकूने केलेल्या या हल्ल्यात ३ प्रवासी गंभीर जखमी झाले. अफगाणिस्तानचा नागरिक असणाऱ्या या तरुणाने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला ठार केले.

बवेरिया शहराचे मंत्री जोआचिम हेर्रमन यांनी हल्लेखोर तरुण अफगाण नागरिक ओच्सेनफर्ट येथे राहत होता अशी माहिती दिली आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ९.१५ वाजता स्टेशनला ट्रेन पोहोचली असता काही वेळातच तरुणाने कु-हाड आणि चाकूच्या सहाय्याने प्रवाशांवर हल्ला करण्यास सुरुवात केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *