देहलीतील जंतरमंतर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी !
देहली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन न्यास यांमधील आर्थिक घोटाळे, तसेच त्यांचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांमुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आहे का, याची चौकशी करण्याची मागणी २० जुलैला येथील जंतरमंतर येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे करण्यात आली. तसेच डॉ. दाभोलकरांना विदेशातून येणार्या पैशांचे ते कोणत्या कामासाठी उपयोग करत होते, या पैशांचा वापर धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी केला जात होता का, याची शासनाने सखोल चौकशी करायला हवी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या आंदोलनात हिंदु स्वाभिमान, अखंड भारत मोर्चा, डासना पीठ, वैदिक उपासना पीठ, फेथ फाउंडेशन, सनातन संस्था, रणरागिनी शाखा, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनात मान्यवरांनी मांडलेली सूत्रे !
१. यति नरसिंहानंदजी, महंत, डासना पीठ तथा राष्ट्रीय संयोजक, अखिल भारतीय संत परिषद – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या समितीवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या कार्याला माझे पूर्ण सहकार्य राहील. जोपर्यंत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणासाठी कार्य करत रहातील तोपर्यंत मी त्यांना तन, मन आणि धन देऊन संपूर्ण सहकार्य करीन.
२. पू. तनूजा ठाकुर, संस्थापक, वैदिक उपासना पीठ – धर्मप्रसार करणार्या आणि समाजाला ईश्वराकडे नेणार्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे हे चार्वाक तत्त्वज्ञानाप्रमाणे आहे. वैदिक उपासना पीठाचे सनातन संस्थेला संपूर्ण समर्थन आहे.
३. पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती – हिंदुद्वेषामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायदा आणून धर्माचरणी हिंदूंवरच बंदी आणू पहात आहे. सनातन संस्थेने जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या न्यासातील घोटाळे बाहेर काढले, तसेच त्यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंधांसारखे देशद्रोही कृत्य समोर आणले तेव्हा ते सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करू लागले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिति एकटी नाही. १६२ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना आमचे समर्थन करत असून त्या सर्वांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. माननीय न्यायालयाने सनातन संस्थेला निर्दोष ठरवल्यानंतरही सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला राज्यघटना आणि कायदा यांवर विश्वास नाही. अशा अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरच बंदी घालावी, अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत.
या प्रसंगी श्री. संदीप आहुजा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखंड भारत मोर्चा; श्रीमती चेतना शर्मा, राष्ट्रीय अध्यक्षा, हिंदु स्वाभिमान संघटना; श्री. दीपक सिंह, अखंड भारत मोर्चा आदी मान्यवरांची भाषणे झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात