मुसलमानबहुल भागात मंदिराला संमती देण्याचे धाडस सिडकोने दाखवले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
- सानपाडा (नवी मुंबई) येथील हिंदुबहुल वस्तीतील मशिदीच्या भूखंडाचे आरक्षण १८ वर्षांपासून रहित करण्याच्या मागणीचे प्रकरण !
- सानपाडावासियांचे चक्का जाम आंदोलन !
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक १७ ए येथे हिंदुबहुल वस्तीमध्ये सिडको प्रशासनाने गेल्या १८ वर्षांपासून मशिदीसाठी दिलेल्या भूखंडाचे आरक्षण हटवावे. सिडको प्रशासनाकडून मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात येत आहे. सिडकोने हिंदूंच्या भावनांचा अंत पाहिल्यास त्याचा उद्रेक होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी येथील हिंदु नागरिकांनी संघटित मोर्च्याद्वारे २१ जुलै या दिवशी दिली.
मागील १८ वर्षे सानपाडावासीय सातत्याने सिडको प्रशासनाकडे वरील मागणी करत आहेत; मात्र सिडको प्रशासनाने याविषयी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. (१८ वर्षे मागणी करून त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन हवेच कशाला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सिडको प्रशासनाचा भूखंड आरक्षणाचा चुकीचा निर्णय हिंदूंसाठी डोकेदुखी ठरला आहे. याविषयी सिडकोने न्यायालयात योग्य भूमिका मांडून मशिदीचे आरक्षण रहित करावे, अशी हिंदूंची मागणी आहे; मात्र अनेक वर्षे होऊनही सिडकोने याविषयी ठोस भूमिका मांडलेली नाही. केवळ प्रशासनामुळे हा विषय संवेदनशील झाला आहे, असा आरोप सानपाडावासियांकडून करण्यात येत आहे. सिडको प्रशासनाच्या या गलथान कारभाराच्या विरोधात सानपाडा-तुर्भे येथे संतप्त शेकडो नागरिकांनी रस्त्यावर येऊन चक्का जाम (चाक बंद) आंदोलन केले. आंदोलनानंतर बेलापूर येथील सिडकोभवनावर मोर्चा नेण्यात आला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मोर्च्याच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. (हिंदूंनो, केवळ निवेदन देऊन थांबू नका, तर योग्य ती कार्यवाही होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अखिल रहिवासी महासंघाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्च्यात अखिल सानपाडा रहिवासी महासंघाचे सर्वश्री कैलास ताजणे, घनश्याम पाटे, मिलिंद सूर्यराव, संतोष पाचलग, अजय पवार, मामा महाले, सुनील चव्हाण, नगरसेवक श्री. सोमनाथ वास्कर, शहरप्रमुख श्री. विजय माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अजय मुडपे, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांच्यासह हिंदू महासभा, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सिडकोचे गगराणी यांना हिंदूंनी दिलेल्या निवेदनानंतर याविषयी लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन गगराणी यांनी दिले. सिडकोचे सहकार्यकारी संचालक राजेंद्र चव्हाण यांनी या वेळी सानपाडावासियांची भूमिका समजून घेतली. मशिदीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी सानपाडाभागातील सर्व हिंदु दुकानदारांनी बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
काय आहे प्रकरण ?
१. वर्ष १९९८ मध्ये सानपाड्याच्या हिंदुबहुल भागात मशिदीसाठी भूखंड आरक्षित करण्यात आला. येथे मुसलमान लोकसंख्या अत्यल्प आहे आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी अनेक प्रार्थनास्थळे आहेत. याकरिता पोलिसांकडून मिळालेला ना हरकत दाखलाही संदिग्ध आहे. आता महानगरपालिकाही बांधकामाला संमती देण्याच्या सिद्धतेत असल्याचे समजते. (मुसलमानांच्या सणाच्या वेळी आणि मुसलमान वस्तीमध्ये हिंदूंना सण साजरा करण्यासाठी आडकाठी करणारे पोलीस अन् प्रशासन हिंदुबहुल भागात मात्र मशिदीसाठी संमती देतेे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. या प्रकरणी येथील हिंदूंनी आतापर्यंत बर्याच वेळा आवाज उठवला. याविषयी वर्ष २०१३ मध्ये येथील हिंदु रहिवाशांनी भव्य मोर्चा काढून मशिदीचे आरक्षण हटवण्याची मागणी केली. त्यानंतर या भागातील हिंदु आणि मुसलमान रहिवासी, तसेच लोकप्रतिनिधी, पोलीस अन् प्रशासन यांची एक बैठक झाली. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने हिंदुबहुल वस्तीऐवजी अन्यत्र मशिदीसाठी भूखंड आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यानंतर या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता दाखवून मुसलमानांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात