काश्मीरप्रमाणेच काहीशी स्थिती उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांत झाली आहे. पुढे सरकार आताप्रमाणेच निष्क्रीय राहिले, तर अशी स्थिती बंगाल, आसाम, केरळ आदी राज्यांत आणि नंतर पूर्ण भारतभरात होईल ! – संपादक, हिन्दूजागृति
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील बाबरी मंडी परिसरात महिलेची छेड काढल्यावरून झालेल्या दंगलीनंतर येथील अनेक हिंदु परिवारांनी घर-दुकान सोडून पलायन केले आहे. जातांना घरांवर विकणे आहे असे लिहिले आहे.
या दंगलीत अनेक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपच्या महापौर शंकुतला भारती भाजप कार्यकर्त्यांसह बाबरी मंडी येथे पोहोचल्यावर घोषणाबाजी करण्यात आली. त्याला पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वाद झाला. भाजपचा आरोप आहे की, पोलीस धर्मांधांना सोडून हिंदूंवरच कारवाई करत आहेत. भाजप हे सहन करणार नाही. (उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंची स्थिती वाईट आहे, याला उत्तरदायी असलेले तेथील समाजवादी पक्षाचे सरकार केंद्र सरकार विसर्जित का करत नाही ? – संपादक, हिन्दूजागृति)
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात