Menu Close

पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे परभणीत गुन्हेगारांना पोषक वातावरण : डॉ. राहुल पाटील, शिवसेना

  • आमदार पाटील यांची पत्रकार बैठकीत टीका

  • पोलीस अधीक्षक ठाकर यांच्या बदलीची मागणी

rahul_patil_shivsena

शहरात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून नासेरबीन चाऊसच्या अटकेनंतर परभणी हे दहशतवाद्यांसाठी महत्त्वाचे केंद्र होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात चालू असलेले अवैध धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत जिल्ह्यातली गुन्हेगारी नष्ट होणार नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची बदली झाली पाहिजे, असे आग्रही मत आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केले. या प्रश्नावर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून जिल्ह्याला कर्तबगार पोलीस अधीक्षक देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावर आमदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत कठोर टीका केली. जिल्ह्यात मटका, जुगारअड्डे आदींसह अनेक अवैध धंदे चालले असून पोलीस त्यावर कारवाई करण्याऐवजी पुरावा मागत आहेत. यापूर्वी आपण दोन-तीन वेळा अवैध धंद्यांचा प्रश्न घेऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. मात्र कोणतीच कारवाई होत नाही. उलट आता परभणी हे गुन्हेगारांना पोषक वातावरण असणारे शहर ठरले आहे. अवैध धंद्यांच्या माध्यमातून पैसा कमावणारे शहरात गुन्हेगारी करीत आहेत, अशी टीकाही यावेळी आमदार डॉ. पाटील यांनी केली.

आगामी महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असून महापालिकेवर भगवा फडकला जाईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *