Menu Close

(म्हणे) गायींचे सर्वेक्षण करून भगवे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही ! : ममता (बानो) बॅनर्जी यांची दर्पोक्ती

जिहादी आतंकवाद सहन करणार नाही, असे ममता बॅनर्जी कधी म्हणतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

mamata_banerjeeकोलकाता : प्रत्येक घरात किती गायी आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचे निमित्त करून बंगाल राज्याचे भगवे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हिंदु जागरण मंच आणि गोरक्षादल करत आहे. त्यामागे काही राजकीय पक्षांचाही हात आहे. हे प्रयत्न मी खपवून घेणार नाही, अशी दर्पोक्ती तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांनी केली आहे. येथे आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, जर कुणी बकर्‍याचे, कोंबडीचे मांस खात असेल, तर कुणाला आक्षेप नसतो; मात्र गोमांसाचा विषय निघाला की, काही लोक ओरडतात. (गोमातेचे महत्त्व जाणून घेतले, तर गोमाता पूजनीय का आहे, हे लक्षात येईल ! ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राज्यकर्त्यांनाच धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांच्याकडून अशी हिंदुद्वेषी विधाने केली जात आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) कुणी साडी अथवा धोतर घातले, तर कुणाला आक्षेप नसतो; मात्र सलवार-कमीज अथवा लुंगी घातली, तर आरडाओरड होते. कुणी काय खावे आणि घालावे हे ठरवणारे हे लोक कोण आहेत ? (वास्तविक हिंदू जागरण मंच आणि गोरक्षादल यांनी गायींचे सर्वेक्षण केलेले नाही, असे सांगितले आहे. सर्वोदय विचार परिषद आणि पांजरपोळ सोसायटी यांनी देशी गायींचे वाण वाढवण्याच्या दृष्टीने असे सर्वेक्षण केले आहे. त्यामागील उद्देश वैज्ञानिक होता; मात्र हिंदुद्वेषाने पछाडलेल्या ममता बॅनर्जी यांच्याकडून सत्य बोलण्याची अपेक्षा कशी करावी ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या प्रसंगी तृणमूल काँग्रेसचे नेते कबीर सुमन (हे पूर्वाश्रमीचे सुमन चट्टोपाध्याय होते. धर्मांतरानंतर ते तृणमूल काँग्रेसचे खासदारही होते.) हे इस्लामी वेशभूषा करून व्यासपिठावर उपस्थित होते. ते म्हणाले, ममता बॅनर्जी दलित आणि मुसलमान यांच्या तारणकर्त्या आहेत. (बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर निवडून आल्यावर हिंदूंना वार्‍यावर सोडणार्‍या ममता (बानो) बॅनर्जी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ज्या सोयीसुविधा आधी केवळ हिंदूंनाच मिळायच्या त्या आता दलित आणि मुसलमान यांना मिळू लागल्या आहेत. त्यामुळे काही राजकीय पक्षांची पोटदुखी वाढली आहे. अजून ३०० वर्षांनंतर ममता बॅनर्जी यांची मंदिरे उभारण्यात येतील आणि लोक त्यांची पूजा करतील. (दिवास्वप्नात रमणारे कबीर सुमन ! ममता बॅनर्जी बंगालचे इस्लामिस्तान करायला निघाल्यामुळे हिंदू असे दुष्कृत्य कधीही करणार नाहीत ! दुसरी बाब म्हणजे मुसलमानांनी हवे ते साध्य केल्यावर ते भविष्यात ममता बॅनर्जी यांना हिरवा रंग दाखवतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *