भिवानी : जिल्ह्यातील दांग खुर्द गावातील निगाणा फीडर मध्ये साधाराण ४५ किलो वजनाचा पाण्यात तरंगणारा दगड सापडला असून हा दगड आजुबाजूच्या परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे. दूर-दूरचे लोक या दगडाला पाहाण्यासाठी दांग खुर्दमध्ये येत आहेत. गावकरी या दगडाला शंकराचे रुप मानत आहेत.
गावकरी ईश्वर सिंहने सांगितले की, बुधवारी तो आपल्या शेतात पाणी घालण्याचे काम करत होता. यावेळी त्याचा मुलगा अजित देखील त्याच्या सोबत काम करत होता. दुपारी त्याने आपल्या मुलाला घरुन चहा घेऊन यायला सांगितले. घरुन चहा घेऊन येत असताना त्याची नजर या तरंणाऱ्या दगडावर पडली.
दोघांनी मिळून त्या दगडाला पाण्याच्या बाहेर काढले व आपल्या घरी घेऊन आले. त्यांनी हा दगड घरातील पाण्याच्या टाकीत टाकून पाहिला असता तो तरंगू लागला. बघता बघता ही गोष्ट गावभर पसरली आणि लोक तरंगणाऱ्या दगडाला बघण्यासाठी गर्दी करायला लागले.
या दगडाचे वजन केले असता ते ४४ किलो ८०० ग्रॅम भरले. हा दगड सिमेंट आणि वाळूचा असल्याचे प्रथमदर्शनी भासते. गावकऱ्यांच्या मते हा भगवान शंकराचा आशिर्वाद आहे. हा दगड गावातील मंदिरात पाण्याची टाकी बांधून त्यात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संदर्भ : इनाडु