लव्ह जिहाद या धर्मांधांच्या राक्षसाने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण युरोपमध्ये धुमाकूळ घातला आहे. या प्रकारात पाकिस्तानहून आलेल्या विस्थापितांचा फार मोठा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. याविरुद्ध जागृती करण्यासाठी मॅकलोलीन नावाच्या लेखकाने इझी मीट हे पुस्तक लिहून या प्रश्नाविषयी सविस्तर ऊहापोह केला आहे. लव्ह जिहादला इंग्लंडमध्ये सेक्स ग्रूमिंग म्हटले जाते, तर नेदरलंडमध्ये अशा धर्मांध युवकांना लव्हर बॉईज् म्हणून ओळखले जाते.
युरोपमधील लव्ह जिहादचे स्वरूप !
सेक्स ग्रूमिंग या प्रकारात धर्मांध युवक शाळेत शिकणार्या १० ते १४ वर्षे वयाच्या मुलींचा पाठलाग करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यांच्याशी गोड बोलून आणि त्यांना मौल्यवान भेटवस्तू देतात. काही दिवसांनंतर याच मुलींची ओळख त्यांच्या मित्रांशी करून दिली जाते. हा सर्व प्रकार खरेदी-विक्री स्वरूपात होतो. नंतर या मुलींना लग्नाचे आमीष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. शेवटी एकतर धर्मांतर करून त्यांना जनानखान्यात कोंबण्यात येते अथवा वेश्याव्यवसायात ढकलले जाते. युरोपमधील मुक्त वातावरण आणि कौटुंबिक आपुलकी यांच्या अभावामुळे तेथील मुली स्वैर असतात. घरून थोडा जरी विरोध झाला, तरी त्या लगेच घर सोडून निघून जातात. त्यामुळे त्यांचे पालक मुलींवर कुठलीही गोष्ट कधी लादत नाहीत. मॅकलोलीन या लेखकाने त्याच्या पुस्तकात म्हटले आहे की, इंग्लंडमधील ९५ टक्के लोक मुसलमानेतर असूनही एकाही बिगर मुसलमान युवकाने मुसलमान युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे एकही उदाहरण अस्तित्वात नाही.
युरोपातील लोकप्रतिनिधी, पोलीस, पत्रकार आणि समाजसेवक यांच्याकडून दुर्लक्ष !
इंग्लंड आणि युरोपात सर्रास चालू असलेल्या लव्ह जिहादच्या प्रकारांविषयी तेथील लोकप्रतिनिधी, पोलीस, पत्रकार आणि समाजसेवक डोळेझाक करत आहेत. गेली २० वर्षे हा प्रकार चालू असल्याचा दावा पीटर मॅगलॉगिलीन यांनी केला आहे. प्रत्येक वर्षी सहस्रो मुली बेपत्ता होतात. धर्मांधांकडून त्यांचा एखाद्या उपभोग्य वस्तूसारखा व्यापार केला जात असल्याचे या पुस्तकात म्हटले असून अशा रीतीने फसवल्या गेलेल्या मुलींची अनेक उदाहरणेही दिली आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात