कुठे स्वत:च्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर रस्त्यावर उतरणारे मुसलमान, तर कुठेस्वत:च्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर त्याचा साधा निषेधही न करणारे धर्माभिमानशून्य हिंदू !
हिंदुद्वेष्टे इतिहासाचे अभ्यासक इरफान हबीब यांचे हिरवे फुत्कार
मालडा (बंगाल) : रामायण आणि महाभारत ज्यांनी लिहिले त्यांनी स्वत: इतिहास लिहिल्याचा दावा कधीही केला नाही. त्यामुळे रामायण आणि महाभारत ही मिथके आहेत, असे हिरवे फुत्कार इतिहासाचे अभ्यासक (?) इरफान हबीब यांनी येथे सोडले. अशा मिथकांना इतिहास मानणे धोक्याचे असून नेमके हेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे, अशीही गरळओक त्यांनी केली. ७६व्या ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’च्या पार्श्वभूमीवर ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने हबीब यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “इतिहासकारांमध्येही वेगवेगळी मते आहेत; पण उजव्या विचारसरणीचे इतिहासकारही राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणणे मान्य करणार नाहीत; कारण जेे मनाला येईल ते दावे ते करत असतात. संघापेक्षा भारत देश खूपच भक्कम आणि खंबीर आहे. येथे धार्मिक असहिष्णुतेला कधीच थारा दिला जाणार नाही. गत वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला विकासाच्या सूत्रावर निवडून दिले; परंतु भाजप सध्या धर्मनिरपेक्षतेला आव्हान देण्यासाठीच आपल्याला सत्ता मिळाल्याच्या आविर्भावात आहे. शालेय पुस्तकांमधील इतिहास पालटणे, हा काँग्रेसचा ‘अजेंडा’ कधीच नव्हता. आपल्या देशात धर्मनिरपेक्ष विचारधारेकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. तथापि शासन नेमके तेच करत आहे. इस्लाममधील कट्टरतावाद धोकादायक आहे; पण हिंदु कट्टरतावादाला प्रत्युत्तर म्हणूनच तो निर्माण झाला आहे. सद्सद्विवेकबुद्धी असलेली कुठलीही व्यक्ती आय.एस्.आय.एस्.चे समर्थन करूच शकत नाही.” (आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात असलेले किंवा त्या आतंकवादी संघटनेकडे आकर्षित होणारे प्रतिदिन सापडणारे आतंकवादी हबीब यांचेच धर्मबांधव आहेत. त्यांच्या देशद्रोही कारवाया थांबवण्यासाठी हबीब साहेबांनी काहीतरी करायला हवे. तसे केले तर ते त्यांचे देशकार्य होईल. इतर गोष्टींविषयीचे त्यांचे विश्लेषण सद्यस्थितीत नगण्य आहे – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात