Menu Close

मध्यप्रदेशात गोमांसाची तस्करी करणार्‍या सलमा आणि शमीम या महिलांना जमावाने चोपले !

देशात धर्मांधांकडून हिंदूंवर, तसेच दलितांवर होणार्‍या अत्याचारांच्या वेळी मायावती आणि अन्य पुरोगामी महिला लोकप्रतिनिधी कधी तोंड उघडत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई करण्यासाठी मायावती यांचा राज्यसभेत थयथयाट !

Beefनवी देहली : मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये रेल्वेगाडीतून ३० किलो गोमांसची तस्करी केल्याच्या संशयावरून सलमा आणि शमीम या २ महिलांना जमावाने चोपल्याच्या घटनेचे पडसाद राज्यसभेत उमटले. येथे बहुजन समाज पक्षाच्या खासदार मायावती यांनी हा प्रश्‍न उपस्थित केल्यावर सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. महिलांना चोपणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली.

१. सलमा आणि शमीम यांच्याकडे रेल्वे फलाटावर ३० किलो मांस सापडल्याने त्यांच्या विरोधात कलम ४ आणि ५ अंतर्गत पशूहत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (जमावाने या दोघींना पकडले नसते, तर पोलिसांनी काहीही केले नसते ! अशा प्रकारे प्रतिदिन गोमांसाची तस्करी होत असतांना पोलीस काय करत असतात ? पोलीस आणि तस्कर यांच्यामध्ये अर्थपूर्ण संबंध आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. पोलिसांनी दोन्ही महिलांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

३. महिलांना करण्यात आलेल्या मारहाणीची कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात आली नसल्याने कोणावरही कारवाई केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *