हिंदू असंघटित असल्यानेच कुणीही त्यांच्या देवतांचे विडंबन करू धजावते. यास्तव हिंदूंनी संघटित व्हावे !
न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियाच्या सांता मोनिका येथील ब्लिझार्ड एन्टरटेनमेंटच्या ओव्हरवॉच नावाच्या व्हिडिओ गेममधून श्री दुर्गादेवीचे विडंबन करण्यात आले आहे. या विरोधात अमेरिकेतील हिंदूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या खेळामधून श्री दुर्गादेवीचे चित्र तातडीने हटवावे, अशी मागणी केली आहे. देवीच्या प्रतिमेचा व्यावसायिक लाभासाठी वापर करणे अयोग्य आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान झाला आहे.
श्री दुर्गादेवीचे स्थान हे मंदिरात किंवा देवघरात असते. जगभरातील कोट्यवधी हिंदु श्री दुर्गादेवीची पूजा करतात. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दुर्गादेवीचे मनोरंजनासाठी वापर करणे अयोग्य आहे. ब्लिझार्ड एन्टरटेनमेंटने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करत हे चित्र तातडीने हटवावे, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. या विडंबनाच्या विरोधात धर्माभिमानी हिंदू सनदशीर मार्गाने निषेध नोंदवत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात