Menu Close

पाकमध्ये एका हिंदूची गोळ्या झाडून हत्या !

  • कोणीही वाली नसलेले पाकमधील हिंदू !

  • कुराणाचा अवमान झाल्याच्या आरोपावरून धर्मांधांची दंगल !

घोटकी (पाकिस्तान) : पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथील एका हिंदु व्यक्तीने कुराणाला कथितपणे अपवित्र केल्यावर उसळलेल्या दंगलीत दोन हिंदु तरुणांंवर गोळ्या झाडण्यात आल्या. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीररित्या घायाळ झाल्याची घटना २७ जुलैला घडली. मयत हिंदूचे नाव दिवान सतीश कुमार (वय १७) असून घायाळ झालेल्याचे नाव अविनाश आहे. या घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

अमर लाल नावाच्या व्यक्तीने कुराणाचा अवमान केल्याचा आरोप आहे. अमर याला अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन आहे. अलीकडेच त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि तो मशिदीत रहात होता. त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ८४ दंगलखोरांनाही अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी प्रशासनाला कोणत्याही धर्माच्या लोकांची हानी होऊ नये, याकडे लक्ष पुरवण्याची विनंती केली आहे. तसेच पक्षातील हिंदु नेते रमेश लाल यांना पीडित परिवाराच्या घरी जाण्यास सांगितले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *