-
यज्ञ-यागावर टीका करणार्यांंना याविषयी काय म्हणायचे आहे !
-
पर्जन्ययागाला प्रारंभ केल्यानंतर ५५ मिलीमीटर पावसाची नोंद
धाराशिव : लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचे अवर्षण दूर व्हावे, तसेच लातूर आणि कळंब परिसरातील धरण क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस व्हावा, या हेतूने बेंगळुरू येथील प्राकृती फाऊंडेशन आणि कासारवाडी-बार्शी, जिल्हा सोलापूर येथील श्री योगीराज वेद विज्ञान आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब येथे २६ जुलैपासून पर्जन्य याग आणि सुवृष्टी कारक प्रवर्ग्य विधीला प्रारंभ झाला. कळंब शहरातील ढोकी रोड येथील श्री साई मंगल कार्यालयात हा विधी होत असून ३० जुलैला विधीची सांगता होणार आहे. कळंब येथील श्री. समीर देशपांडे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. दिपाली देशपांडे यागाच्या यजमानपदी आहेत.
यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील काही भागांत थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत आहे; मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत नसल्याने धरणाला पाण्याचा पुरवठा होत नाही. सध्या चालू असलेला पर्जन्ययाग येथील धनेगाव या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आहे.
२६ जुलैला पर्जन्ययागाला प्रारंभ केल्यानंतर तेथे ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमचे अहिताग्नि सोमयाजी श्री. चैतन्य काळे गुरुजी यज्ञाचार्य असून त्यांच्यासह आश्रमातील १६ ऋत्विज यांनी या यज्ञाचे पौरोहित्य करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात