जळगाव : प्रत्येक हिंदूने धर्माचा प्रवक्ता व्हायला हवे. आज धर्म कुठेच शिकवला जात नसल्यामुळे हिंदूंना धर्मासाठी एक व्हा, असे सांगावे लागते. सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते; मात्र आज तिच्यावरच बंदी आणण्याचा प्रयत्न चालू आहे. हा एकप्रकारे हिंदु धर्माला कलंकित करण्याचाच प्रयत्न आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी केले. येथील एकचक्रनगरी (एरंडोल) येथे ३० जुलै या दिवशी झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्याला ह.भ.प. गजानन महाराज वरसाळेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. संघटन मेळाव्यापूर्वी सभागृहामध्ये संतांनी गायलेली भजने लावल्यामुळे वातावरणात चैतन्य जाणवत होते, तर कार्यक्रमाच्या आरंभी धर्माभिमान्यांनी ढोलताशे वाजवून त्यांचा उत्साह व्यक्त केल्यामुळे वातावरणात वीरश्री निर्माण झाली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांचा सत्कार धर्माभिमानी श्री. श्रीकांत कासार यांनी केला, तर रणरागिणी शाखेच्या कु. पूजा जाधव यांचा सत्कार सौ. रेणुका बिरला यांनी केला.
मुलींवर अत्याचार करणार्या वासनांधांचा चौरंगाच करायला हवा ! – कु. पूजा जाधव, रणरागिणी शाखा
धरणगाव येथील ५-६ वर्षांच्या मुलीला धर्मांध युवकाने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी वाचली; पण नंतरचे २ दिवस ती अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होती. पोलिसांनी धर्मांधाच्या विरोधात चुकीच्या कलमांद्वारे गुन्हा प्रविष्ट केला. अशा धर्मांधांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या नीतीनुसार चौरंगाच करायला हवा. तसे झाल्यासच वासनांधांना वचक बसेल.
क्षणचित्रे
१. एरंडोल शहरात एका मासापूर्वी चालू झालेल्या धर्मशिक्षण वर्गातील मुलांनी मेळाव्याची सेवा केली.
२. एका धर्माभिमान्याने चांगल्या गुणवत्तेची ध्वनीवर्धक यंत्रणा स्वखर्चाने आणून दिली.
३. हिंदूंच्या कार्यक्रमात धर्मांधांना ढोलताशे वाजवण्यासाठी बोलवावे लागू नये; म्हणून शहरातील धर्माभिमानी युवकांनी स्वतःचे ढोलताशा पथक सिद्ध केले आहे.
४. मेळाव्याला उपस्थित महिलांपैकी २ जणींनी उस्फूर्तपणे हिंदु राष्ट्राविषयीचे गीत सादर करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ये भारत हिंदु राष्ट्र है । या आशयाचे गीत सादर केले. या रणरागिणींनी उत्स्फूर्तपणे धर्माचा प्रवक्ता होण्याचीही इच्छा व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात