नागपूर – १५ ऑगस्टला प्लास्टीकचे ध्वज विकत घेतले जाऊन नंतर ते रस्त्यात कुठेही टाकले जातात. त्यामुळे ध्वजाची विटंबना होते. त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, तसेच प्लास्टीकच्या ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, यासाठी नागपूर शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अतुल आर्वेन्ला, अभिजीत पोलके, संकेत चिंचोळकर उपस्थित होते. या वेळी श्री. पाटील यांनी आपण करीत असलेले कार्य चांगले आहे. याची अत्यंत आवश्यकता आहे. हे निवेदन शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना सर्व शाळांमधून प्रबोधन करण्यासाठी पाठवत आहे, असे सांगितले. यासोबतच पोलीस उपआयुक्त नागपूर शहर यांनासुद्धा निवेदन देण्यात आले.
संदर्भ – दैनिक सनातन प्रभात