Menu Close

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात प्रसंगी रस्त्यावरही उतरू ! – चैतन्य छत्रेगुरुजी

बेळगाव पुरोहित संघाच्या वतीने सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात पत्रकार परिषद

डावीकडून श्री. वसंत जोशीगुरुजी, श्री. चैतन्य वासुदेव छत्रेगुरुजी, श्री. हृषिकेश हेर्लेकरगुरुजी, श्री. संजय वाळवेकरगुरुजी, श्री. महेश कडवाडकरगुरुजी

सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे पुरोहित आणि उपरी ग्रामपंचायत यांचे आभार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

बेळगाव – सनातनचे कार्य हिंदूंना प्रेरणा देणारे आहे. असे असतांना तिच्या साधकांचा नाहक छळ केला जात आहे. कोणतेही आरोप सिद्ध झालेलेे नसतांना पुरोगाम्यांची सनातनवर बंदी घालण्याची ओरड का ? आम्हा पुरोहित सदस्यांचा सनातन संस्थेला पूर्ण पाठिंबा आहे. समाजाला दिशा देणार्‍या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे. या अन्यायकारक बंदीला आमचा पूर्ण विरोध आहे. यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावरही उतरू, अशी चेतावणी श्री. चैतन्य छत्रेगुरुजी यांनी दिली. येथील अनसूरकर गल्ली, छत्रेवाडा येथे ३० जुलै या दिवशी बेळगाव पुरोहित संघाच्या वतीने सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. व्यासपिठावरील उपस्थित अन्य गुरुजींनीही सनातनच्या कार्याचा गौरव करत सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवला.

श्री. चैतन्य वासुदेव छत्रेगुरुजी म्हणाले, समाजात धर्माचे प्रबोधन करून धर्माचरणाच्या कृती कशा करायच्या, याविषयी मार्गदर्शन करून धर्मजागृती करणारी सनातन संस्था ही हिंदूंना अभिमान वाटावा, अशी संस्था आहे; मात्र काही पुरोगामी राजकीय हेतूने प्रेरित होऊन सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत.

अन्य पुरोहितांनी सनातनविषयी काढलेले गौरवोद्गार

१. श्री. हृषिकेश हेर्लेकरगुरुजी – सनातन संस्थेच्या माध्यमातून भगवंताचे धर्मरक्षणाचे अवतारी कार्य चालू आहे !
२. श्री. वाळवेकरगुरुजी – सध्या कलियुगात धर्मरक्षणाचे कार्य सनातन प्रभातच्या माध्यमातून प्रभावीपणे चालू आहे.
३. श्री. महेश कडवाडकरगुरुजी – सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदू आणि हिंदु संघटना यांना अपकीर्त करण्याचे कारस्थान तथाकथित पुरोगाम्यांकडून केले जात आहे. सनातनच्या संदर्भातही तसेच घडत आहे.
४. श्री. वसंत जोशीगुरुजी – समाजात निरपेक्षपणे धर्मप्रसार आणि हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी प्रयत्न करणारी एकमेव संस्था म्हणजे सनातन संस्था !

क्षणचित्र : पत्रकार परिषदेचा प्रारंभ वेदमंत्रपठणाने झाला आणि सांगता श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून झाली.

उपरी (पंढरपूर) ग्रामपंचायतीकडून सनातनवरील बंदीच्या मागणीस विरोध दर्शवणारा ठराव संमत !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर तालुक्यातील उपरी या ग्रामपंचायतीने सनातन संस्थेवरील अन्यायकारक बंदीच्या मागणीला विरोध दर्शवत एकमुखाने ठराव संमत केला. या ठरावात ग्रामपंचायतीने म्हटले की, सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था आहे. संस्थेचे कार्य देशभरात चालू आहे. सनातन संस्थेने कोणासही चुकीचे मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे सनातन संस्थेवर शासनाने बंदी आणू नये. ग्रामपंचायतीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पत्र पाठवण्यात आले आहे. या वेळी उपरी गावच्या सरपंच सौ. वैशाली हणमंत नागणे आणि अन्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सनातन संस्थेचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी सरपंच यांची भेट घेतल्यावर वरील ठराव संमत करण्यात आला.

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात 


सनातन संस्थेकडून राबवल्या जाणार्‍या उपक्रमांमुळेच चारित्र्यसंपन्न पिढी सिद्ध होऊन समृद्ध समाज प्रस्थापित होईल ! – सचिन इनामदार

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात बेळगाव येथील हिंदुत्ववादी आणि राष्ट्र्प्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने पत्रकार परिषद

डावीकडून सर्वश्री भालचंद्र जाधव, सचिन इनामदार, व्यंकटेश शिंदे, पृथ्वीराज काकतकर

बेळगाव – ऋषिमुनी, तसेच संत यांनी सांगितलेल्या शास्त्राप्रमाणेच सनातन संस्थाही समाजप्रबोधन करत आहेत. समाजातील अध्यात्म आणि धर्म यांविषयीचे चुकीचे समज दूर होऊन समाज नीतीवान होण्यासाठी सनातनकडून अनेक उपक्रम राबवले जातात. याच माध्यमांतून चारित्र्यसंपन्न पिढी सिद्ध होऊन समृद्ध समाज प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन श्री. सचिन इनामदार यांनी केले. येथील रामनाथ मंगल कार्यालयात हिंदुत्ववादी आणि राष्ट्र्प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या होणार्‍या मागणीला विरोध करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (सनातनच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेणार्‍या सर्वच धर्मप्रेमींचे आभार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

श्री. इनामदार पुढे म्हणाले, आमचा हा मित्र परिवार कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, तसेच कोणत्याही संघटनेचेही आम्ही सभासद नाही; परंतु आम्ही हिंदु धर्माशी निगडीत सकारात्मक विचारविमर्श करून हिंदु धर्म आणि समाज यांच्या समृद्धीसाठी कार्य करत असतो. सनातन संस्थाही गेली अनेक वर्षे हेच कार्य करत आहे.

या पत्रकार परिषदेला धर्मप्रेमी सर्वश्री भालचंद्र जाधव, व्यंकटेश शिंदे, पृथ्वीराज काकतकर उपस्थित होते, तसेच हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने सनातनला पाठिंबा दर्शवण्यासाठी ३० हिंदुत्वनिष्ठही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *