राजस्थान हायकोर्ट अॅडव्होकेट्स असोसिएशन, जोधपूरकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
जोधपूर : सनातन संस्था राजस्थानच्या शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांत ऋषीपरंपरा अन् साधना यांचे संस्कार देण्याचे अमूल्य कार्य करत आहे. सनातनच्या आध्यात्मिक शिक्षणामुळे युवकांसह जनतेची चेतना जागृत होत आहे. एकंदरच सनातन संस्थेचे समाज आणि राष्ट्र विकासात अभूतपूर्व योगदान आहे. काही राष्ट्रविरोधी आणि नास्तिक विचारांच्या संघटना संस्थेवर बंदी आणण्याची मागणी शासनाकडे करत आहेत. हे एक षड्यंत्र असून आमच्या असोसिएशनच्या सर्व अधिवक्त्यांच्या वतीने गृहमंत्र्यांना विनंती आहे की, कृपया सनातन संस्थेच्या कार्यावर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध आणू नयेत, असे पत्र राजस्थान हायकोर्ट अॅड्व्होकेट्स असोसिएशन, जोधपूरचे अध्यक्ष अधिवक्ता रणजित जोशी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले आहे. (समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या सनातन संस्थेच्या पाठीशी उभे रहाणारे राजस्थान हायकोर्ट अॅड्व्होकेट्स असोसिएशन, जोधपूरचे अध्यक्ष अधिवक्ता रणजित जोशी आणि अन्य सर्व सदस्यांची सनातन संस्था आभारी आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात