काश्मिरी हिंदूंना त्यांचे न्याय्य अधिकार मिळवून देण्यासाठी भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रयत्नांना गती !
इंदूर (तेलंगण) : केंद्रसरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंविषयी त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी विस्थापित काश्मिरी हिंदूंकडून १९ जानेवारी २०१७ या दिवशी चलो कश्मीर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतभरातील १६० हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने एक भारत अभियान – कश्मीर की ओर या राष्ट्रव्यापी जागृतीपर मोहिमेस आरंभ करण्यात आला आहे. या अंतर्गत हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी भारतभरात ८० सभा घेण्यात येणार आहे. त्यांतील इंदूर येथे झालेली सभा पाचवी होती. सभेच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस येऊनसुद्धा ९०० धर्माभिमानी हिंदू या सभेला उपस्थित होते. या सभेत मान्यवरांनी पुढील विचार व्यक्त केले.
काश्मीरमध्ये लोकांना कसे मारले जाऊ शकते, हीच काश्मीरमधील धर्मांधांची विचारसरणी ! – राहुल राजधान, दक्षिण भारत प्रमुख, पनून कश्मीर
काश्मिरी हिंदूंची समस्या केवळ काश्मीरपुरती मर्यादित नसून ती प्रत्येक ठिकाणची आहे. काश्मीरमध्ये मी काश्मिरी आहे, असे म्हणणे अशक्यप्राय गोष्ट आहे. तेथील राज्यसरकारकडे काश्मिरी हिंदूंविषयीची माहिती देणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. असे असूनसुद्धा शासन आम्ही काश्मिरी असल्याचा पुरावा आमच्याकडे मागते. तेथे धर्मांध स्वत:च्या मनाने सर्वकाही पालटून टाकतात. हिंदूंचे पलायन होण्याची ही काही पहिली वेळ नाही. प्रत्येक शतकात असे झाले आहे. काश्मीरमधील धर्मांधांचे एकच म्हणणे आहे, एकतर धर्मांतर करून मुसलमान व्हा अथवा काश्मीर सोडून चालते व्हा ! काश्मीरमध्ये कोणताही विकास साधला जात नाही. तेथे केवळ लोकांना कसे मारू शकतो, या विषयात प्रगती साधली जात आहे.
हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान बंद करा ! – टी.एन्. मुरारी, प्रदेशाध्यक्ष, तेलंगण आणि आंध्रप्रदेश, शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी मुसलमानांना हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान बंद करायला हवे. काश्मीरच्या समस्येवर पोलिसांनी जर आधीच कठोर कारवाई केली असती, तर आज आपल्याला येथे इंदूरमध्ये अशी सभा घेण्याची आवश्यकता पडली नसती.
चलो कश्मीर या मोहिमेत एका हिंदूने १० हिंदूंना बरोबर घेऊन जायचे आहे ! – तपन घोष, संस्थापक अध्यक्ष, हिंदु संहति, बंगाल
काश्मीरचा विषय तेलंगणात आणण्यासाठी मी शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांचे आभार मानतो. आपण जर काश्मीरला वाचवू शकलो नाही, तर केरळ, बंगाल आणि तेलंगण या राज्यांनाही आपण वाचवू शकणार नाही. काश्मीरच्या नावावर इस्लामला प्रोत्साहन देण्यात येत आहे. हा ढोंगीपणा आपल्याला सर्वांसमोर आणायचा आहे. चलो कश्मीर या मोहिमेत एका हिंदूने १० हिंदूंना बरोबर घेऊन जायचे आहे !
काश्मीरची भयावह परिस्थिती आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची आहे ! – मुरली मनोहर शर्मा, हिंदु रक्षा मंच, ओडिशा
आतंकवादी आपल्या सैनिकांना गोळी मारतात आणि आपले सरकार त्यांना जिवंत पकडायला सांगते. काश्मीरची भयावह परिस्थिती आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची आहे.
२६ जानेवारीला श्रीनगरच्या लाल चौकात भारताचा राष्ट्रध्वज फडकवणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
आज आपण सर्वजण काश्मिरी हिंदूंना आश्वासन देऊया की, १९ जानेवारी २०१७ या दिवशी आपण काश्मिरात जाणार आणि २६ जानेवारीला श्रीनगरच्या लाल चौकात भारताचा राष्ट्रध्वज फडकवणार !
या वेळी ओडिशातील हिंदु रक्षा मंचचे श्री. अनिल धीर, तसेच लखनौचे हिंदु फ्रंट फॉर जस्टिस या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अधिवक्ता श्री. विष्णुशंकर जैन यांनी उपस्थित हिंदूंना चलो कश्मीर या राष्ट्रव्यापी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
क्षणचित्रे
१. या वेळी श्री. मुरारी यांनी राहुलजी (श्री. राहुल राजधान) आप आगे बढो, हम आपके साथ हैं !, ही घोषणा सर्वांकडून करवून घेतली.
२. व्यासपिठावर अधिवक्ता श्री. गंगाधर गौड आणि शिवसेनेचे इंदूर जिल्हाध्यक्ष श्री. गोपी किशन गौड हेही उपस्थित होते.
३. सभेला उपस्थित धर्माभिमानी हिंदूंना विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या दु:स्थितीची चित्रफित दाखवण्यात आली.
४. सभेला के सिक्स या स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसिद्धी दिली.
निजामाला अवघ्या ५ दिवसांत पराभूत करणार्या भारतीय सैन्याचा पराक्रम लक्षात ठेवा ! – श्री. रमेश शिंदे
इंदूर शहराचे प्रचलित नाव निजामाबाद आहे. यावर बोलतांना रमेश शिंदे म्हणाले, निजामाबादमध्ये आधी २ लक्ष २२ सहस्र रझाकार आणि निजाम रहायचे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय सैन्याला पाठवून अवघ्या ५ दिवसांत निजामाला पराभूत केले. (निजाम को हजाम कर दिया ।, अशी प्रचलीत म्हण आहे.) त्यामुळे या शहराचे नाव निजामाबादऐवजी हजामाबाद असायला हवे ! (भारतीय सैन्याचा पराक्रम आणि निजामाची झालेली धूळधाण लक्षात रहावी, यासाठी श्री. शिंदे यांनी उपरोधिकपणे हे वक्तव्य केले.)
एका हिंदु धर्माभिमान्याने हिंदु जनजागृती समितीचे उत्स्फूर्तपणे केलेले कौतुक !
सभेला उपस्थित एका हिंदु धर्माभिमान्याने हिंदु जनजागृती समितीचे कौतुक करत म्हटले, समितीकडून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कशी करायची, हे शिकलो. आपण (समितीचे कार्यकर्ते) प्रत्येक कृती योग्य पद्धतीने करता !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात