- सरकार आणि पोलीस यांना डॉ. झाकीर नाईक देशद्रोही असल्याचे आणखी किती पुरावे मिळाल्यावर ते त्यांना अटक करणार आहेत ?
- हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते अन्य धर्मांमध्ये धर्मातरित होतात !
- ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणारे हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : डॉ. झाकीर नाईक यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे प्रभावित होऊन राजस्थानमधील एका हिंदु युवकाने धर्मांतर केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. संदीप रावल असे त्याचे नाव असून तो राजस्थानमधील लाटाडा येथील मूळचा रहिवासी आहे.
१. संदीप रावल याच्या वडिलांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे. वर्ष २००५ मध्ये त्यांनी संदीपला बेंगळुरू येथे मित्राकडे इलेक्ट्रॉनिक्सचे काम शिकण्यासाठी पाठवले. त्या कालावधीत धर्मांध इमरान खान या झाकीर नाईकच्या सहकार्यासमवेत संदीपची मैत्री झाली.
२. बेंगळुरू येथील एस्पी रोडवर इमरानचे दुकान होते. त्याने डॉ. झाकीर नाईक यांच्या ध्वनीचित्रफीती दाखवून संदीपला इस्लामच्या जाळ्यात ओढले. (हिंदूंनो, धर्मांधांचे धर्मांतराचे कारस्थान जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे विवाहानंतर संदीपने पत्नीलाही धर्मांतर करण्याचा आग्रह केला.
३. इस्लाम स्वीकारल्यानंतर त्याने अब्दुल रहमान नाव वापरण्यास प्रारंभ केला. संदीपने धर्मांतर केल्याचे घरी समजताच त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. (हिंदूंनो, ही वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी आपल्या मुलांना वेळीच धर्मशिक्षण द्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. धर्मांतर केल्याने संदीपच्या पत्नीने त्याची साथ सोडली. त्यानंतर संदीपने एका मुसलमान मुलीशी निकाह केला. त्यांना दोन मुले झाली. बेंगळुरूच्या जे.सी. नगरमध्ये तो भाड्याच्या घरात रहात होता.
५. गेल्या वर्षी संदीपने कुटुंबियांकडेही धर्मांतर करण्याचा आग्रह केला होता. तसेच नातेवाइकांना एकत्र करून इस्लामचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते; मात्र घरी आल्यानंतर कुटुंबियांनी संदीपला समजावून त्याच्याकडून हिंदु धर्म स्वीकारला असल्याचे शपथपत्र लिहून घेतले.
६. कागदोपत्री संदीप जरी हिंदु असला, तरी प्रत्यक्षात संदीपने स्वत:ला हिंदु म्हणून घेण्यास नकार दिला. घरात पूजा-अर्चा करण्यास आणि देवतांची चित्रे लावण्यास त्याने विरोध केला, तसेच आईला बुरखा घालण्याचा आग्रहही केला. (ही आहे इस्लामची कट्टरता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
७. आई-वडिलांनी हिंदु धर्म सोडण्यास नकार दिल्यामुळे संदीपने अचानक घर सोडले. त्याने स्वत:जवळील सीमकार्डही तोडून टाकले. घरातून जातांना त्याने ४५ सहस्र रुपये नेल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे.
८. या संदर्भात पोलिसांनी आम्ही संदीपची चौकशी केली असून तो बेंगळुरूमध्येच आहे, तसेच कायद्यानुसार त्याला मूळ धर्मात घेता येणार नाही, अशी माहिती दिली.
९. बेंगळुरू येथे संदीपचा शोध घेतला असता त्याच्या पारपत्रावर असलेल्या पत्त्यावर तो सापडला नाही. तेथील घरमालकाच्या सांगण्यानुसार त्याला सौदी अरेबियामध्ये जाण्याची इच्छा असल्याचे समजते.
१०. संदीपचे धर्मांतर करणार्या इमराननेही काही वर्षांपूर्वीच स्वत:चे दुकान विकल्याचे समजले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात