डॉ. झाकीर यांच्या विरोधात किती पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे ?
कोची (केरळ) : धर्मांतर करून इसिसमध्ये भरती झालेली ख्रिस्ती धर्मीय मरीन उपाख्य मरियम या विद्यार्थिनीने जिहादी आतंकवादाचे प्राथमिक प्रशिक्षण कोची येथील पीस इंटरनॅशनल स्कूल या संस्थेत घेतल्याचे उघड झाले आहे. ही संस्था डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेशी संलग्न आहे.
मरीन ही बेंगळुरू येथे एका कॉलसेंटरमध्ये काम करत होती. तिने धर्मांतर करून बेन्सन उपाख्य याह्या या मूळ ख्रिस्ती मात्र नंतर इस्लाममध्ये धर्मांतरित झालेल्या तरुणाशी विवाह केला. तिला पीस इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास याह्या यानेच बाध्य केले. नंतर मरियम परवूर येथील याच शाळेच्या शाखेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिथेच तिच्यात जिहादी आतंकवादाचे बीज पेरले गेले.
पीस इंटरनॅशनल स्कूलच्या मंगळुरू, कासारगौड, त्रिक्कारीपूर, किल्लाम, एर्नाकुलम्, कोझीकोड, मंजेरी, वेन्गाला, कोत्ताकाल आणि माठीलाकाम् येथे शाखा आहेत. त्यांची खाजगी मशीद असून या शाळांत श्रीमंत आणि उच्चभ्रू कुटुंबांतील मुलांना प्रवेश घेण्यास उद्युक्त केले जाते. त्यामुळे शाळेला भरपूर देणग्या मिळतात.
इसिसच्या भरती कार्यक्रमात मोठा वाटा असलेला डॉ. इजास रशीद याचाही या संस्थेशी जवळचा संबंध आहे. या शाळेला श्रीनगर आणि भाग्यनगर येथून लाखो रुपयांचा निधी मिळाल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात