ढाका : इस्लामचे धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक यांच्या बांगलादेशमधील ‘पीस स्कूल’ नावाने सुरु असलेल्या सर्व शाळा बंद करा, असे आदेश बांगलादेश सरकारने दिले आहेत. झाकीर नाईक यांच्या बांगलादेशमधील ‘पीस टीव्ही’ वरही बांगलादेश सरकारने याआधीच बंदी घातलेली आहे.
बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयाने हे आदेश दिले असून झाकीर नाईक यांच्या बांगलादेशमधील बेकायदेशीर ‘पीस स्कूल’ च्या सर्व ब्रान्चेसवर बंदी घालण्यास सांगितले आहे. बांगलादेशमध्ये पीस स्कूलची किती संख्या आहे याची आकडेवारी बांगलादेश सरकारकडे उपलब्ध नाही. लालमतिया येथील वादात सापडलेल्या पीस स्कूल या शाळेची नोंदणी रद्द करण्यासाठी ढाका एज्युकेशन बोर्डाने पुढाकार घेतला आहे. पीस स्कूल या नावाचे बांगलादेशात २७ इंटरनॅशनल स्कूल आणि काही कॉलेज आहेत. बांगलादेशमधील ढाका, म्यामेनसिंग, किशोरीगंज, गाझीपूर, नौखाली, फेनी या परिसरात असलेल्या शाळांचा यात समावेश आहे. बांगलादेशची राजधानी ढाक्यात पीस स्कूलचे लालमतिया, मलिबाग आणि उत्तरा या तीन ठिकाणी कॅम्पस असून त्याचे प्राचार्य म्हणून डॉ. झाकीर नाईक हेच काम पाहत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स