पतंजलीच्या विरोधात मुसलमान संघटनेचा फतवा
- गोमूत्र न चालणार्यांना गोमांस कसे चालते ?
- गोमूत्र हे इस्लाममध्ये निषिद्ध असल्याचा कांगावा !
चेन्नई – योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांच्या विरोधात तमिळनाडू तौहीद जमात या मुसलमान संघटनेने फतवा काढला आहे. पतंजलीच्या बहुतांश उत्पादनांमध्ये गोमूत्राचा वापर करण्यात येतो. गोमूत्र हे इस्लाममध्ये हराम (निषिद्ध) मानले गेले आहे यामुळे पतंजलीची सौंदर्यप्रसाधने, औषधी, तसेच अन्न उत्पादने खरेदी करू नयेत, असे या फतव्यात म्हटले आहे. पतंजलीने वर्ष २०१५ मध्ये जवळपास २ सहस्र कोटी रुपयांचा नफा मिळवला असून पतंजलीच्या व्यवसायात ६७ टक्के वृद्धी झाली आहे. पतंजलीने प्रमुख आस्थापनांसमोर आव्हान उभे केले असून इमामी, प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल आणि ज्योति लॅब्स यांसारख्या आस्थापनांना मागे टाकले आहे. देशभरात पतंजलीची जवळपास ४ सहस्र दुकाने आहेत.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात