Menu Close

मातृभूमी, गोमाता आणि महिला यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : राष्ट्राची सद्यस्थिती अतिशय विदारक असून मातृभूमी, गोमाता आणि महिला यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र्र हाच एकमेव पर्याय आहे, असे ठाम मत रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी मांडले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ जुलै या दिवशी तुळजापूरमधील काटी येथे पार पडलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात त्या बोलत होत्या.

कु. प्रतीक्षा कोरगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सौ. स्वामी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. काटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. मुसळधार पाऊस पडत असतांनाही ७० तरुणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

मार्गदर्शन करतांना कु. प्रतीक्षा कोरगावकर पुढे म्हणाल्या, आज सर्वधर्मसमभावाच्या नावावर हिंदूंचा छळ केला जात आहे. राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू केला असूनही उघडपणे गायींची हत्या होत आहे. हिंदूंच्या लक्षावधी मुली लव्ह जिहादच्या विळख्यात सापडत असून त्यांचे धर्मांतर होत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांनी संघटितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *