कठीण काळात सनातनला खंबीरपणे पाठिंबा दर्शवणार्या हिंदुत्वनिष्ठांचे आभार !
काही पुरोगाम्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे; मात्र त्याचसोबत सनातनला मिळणार्या पाठिंब्यातही वाढ होत आहे. सनातनवरील बंदीच्या संदर्भात केरळ राज्यातील विविध मान्यवरांनी सनातनला पाठिंबा दर्शवला असून या बंदीच्या विरोधात ते केंद्रशासनाला पत्र लिहिणार आहेत.
१. ज्येेष्ठ अधिवक्ता गोविंद भारतन् यांनी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. तसेच सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात पोस्टकार्डवर स्वाक्षर्या घेण्याची सिद्धता दर्शवली.
२. सनातन प्रभातच्या एका वर्गणीदाराने सनातनवर बंदी आणू नये, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाला ई मेल पाठवणार असल्याचे सांगितले.
३. अधिवक्ता राजन हे सनातन प्रभातचे वर्गणीदार आहेत. त्यांनी सनातनवरील अन्याय्य बंदीच्या विरोधात पत्रे लिहिण्याची सिद्धता दर्शवली.
४. हनुमान सेनेचे अध्यक्ष श्री. रंजित नायर यांनी सनातन संस्थेविषयी विश्वास व्यक्त करत बंदीच्या विरोधातील पत्रावर उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी केली.
याशिवाय माता अमृतानंदमयी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे श्री. प्रदीश विश्वनाथ, तसेच एस्एनडीपी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष श्री. वेल्लापल्ली नटेशन् यांचीही भेट घेऊन त्यांना सनातनवरील बंदीच्या विरोधात चालू असलेल्या षड्यंत्राविषयी अवगत करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात