फलटण : १९७६ या वर्षी कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. या धर्मनिरपेक्ष देशात केवळ हिंदूंवरच अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण करून हिंदूंनी दिलेला पैसा अन्य धर्मियांना दिला जात आहे. हज यात्रेसाठी मुसलमानांना ८२६ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र हिंदूंच्या कुंभमेळ्याला अधिभार लावला जातो. आतंकवादी इशरत जहांला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार बिहारची मुलगी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड बहीण असे संबोधतात. दुसरीकडे सनातनच्या ८०० निरपराध साधकांचा मात्र हत्येच्या खोट्या आरोपांखाली छळ चालू आहे.
हिंदु संघटनांवर अकारण बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होत असलेला हा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही, असे प्रातिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर यांनी केले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. सभेच्या आरंभी अधिवक्ता सांगोलकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्रपठणाने सभेचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी हिंगणगाव येथील धर्माभिमानी सौ. साधना शिंदे यांनी रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांचा, तर धर्माभिमानी श्री. उदय पिसाळ यांनी श्री. नीलेश सांगोलकर यांचा सत्कार केला. ५०० धर्माभिमान्यांनी या सभेचा लाभ घेतला.
स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! – सौ. अनिता बुणगे, रणरागिणी शाखा
स्वसंरक्षण करणे, हा राज्यघटनेने दिलेला अधिकार दिला आहे. आझाद मैदानात रझा अकादमीने काढलेल्या मोर्च्यात महिला पोलिसांवर अत्याचार करण्यात आले. पोलीसच जर स्वत:ला वाचवू शकत नसतील, तर ते तुमचे रक्षण करतील, या भ्रमात राहू नका. त्यामुळे स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. शारीरिक सिद्धतेसह आपले मनोबल वाढणेही महत्त्वाचे आहे, असे मत रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांनी या वेळी व्यक्त केले.
क्षणचित्रे
१. सभेनंतर ५० हून अधिक धर्माभिमान्यांनी थांबून राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या शंकाचे निरसन करून घेतले.
२. सभा ग्रामीण भागात, तसेच पावसाळी वातावरणात असूनही सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात