असे किती लव्ह जिहादचे बळी गेल्यानंतर हिंदु तरुणींना शहाणपण येणार आहे ?
दुबई : रायगड येथील अतिफ पोपेरे याला २४ वर्षीय पत्नी बुशराच्या हत्येप्रकरणी दुबईत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातच्या कायद्यानुसार त्याला गोळीबार पथकाकडून गोळ्या झाडून मृत्यूदंड देण्यात येणार आहे. त्याच्या पत्नीच्या कुटुंबियांनी क्षमा केल्यास त्याला या शिक्षेत सूट मिळू शकते; परंतु ही शक्यता बुशराच्या आईकडून नाकारण्यात आली आहे. अतिफने बुशरा (पूर्वाश्रमीची मिनी धनंजयन)ला प्रेमाच्या जाळ्यात फसवून विवाह केला होता.
१. रायगड जिल्ह्यात रहाणारा आतिफने माटुंग्याच्या कॉलेजमध्ये शिकणार्या मिनी धनंजयन या हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
२. वर्ष २००८ मध्ये दोघांनीही विवाह केला. त्यानंतर मिनीने हिंदु नाव पालटून इस्लाम धर्मानुसार बुशरा ठेवले.
३. वर्ष २००९ मध्ये त्यांना मुलगी झाल्यानंतर आतिफ दुबईत नोकरीसाठी गेला. त्यानंतर २ वर्षांनी बुशराही दुबईला गेली; परंतु वर्षभरातच बुशराला आतिफच्या पालकांकडे रायगडला परत पाठवण्यात आले.
४. वर्ष २०१३ ला बुशराचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे तिच्या पालकांनी तिच्या दुबईतल्या भावाला दूरध्वनीवरून विचारणा केली.
५. बुशराचा भाऊ निगीलने शोधाशोध केली; परंतु काहीच माहिती न मिळाल्याने त्याने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर बुशराचा मृतदेह दुबईतील अल् फक्वा भागात आढळून आल्याचे १३ मार्च २०१३ या दिवशी पोलिसांनी भावाला कळवले.
६. शवविच्छेदनाच्या अहवालात बुशराची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
७. बुशराचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता झालेला पोपेरे सहकार्यांच्या साहाय्याने भारतात परतला. त्यानंतर जून २०१३ मध्ये स्वतः संयुक्त अरब अमिरातमध्ये जाऊन त्याने पोलिसांपुढे शरणागती पत्करली.
८. मुलीच्या मृत्यूनंतर त्या नराधमाला शिक्षा होतांना पाहण्यासाठीच मी दिवस काढत आहे, असे बुशराच्या आईने म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात