सैनिकांवर आक्रमण करण्याचे धाडस गोतस्करांमध्ये होतेच कसे ?
सिलीगुडी (बंगाल) : बांगलादेशच्या सीमेवरून गोतस्करी करणार्या तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणार्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर त्यांनी आक्रमण केल्याने यात ८ सैनिक घायाळ झाले. (सैनिकांना गोतस्करांवर कारवाई करण्याचे अधिकार का देण्यात येत नाहीत ? आधी काश्मीर आणि आता बंगालमध्ये समाजकंटकांकडून सैनिकांना लक्ष्य केले जात आहे ! केंद्रशासनाने यात लक्ष घालून सैनिकांना अधिक अधिकार देण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सैनिकांनी तस्करांकडून ३४ गायी जप्त केल्या. ही घटना सिलीगुडीजवळील लियूसीपाखरी बाजाराच्या परिसारात घडली.
गोतस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सैनिक येथे लक्ष ठेवून होते. २ ऑगस्टच्या पहाटे गोतस्कर गायी घेऊन जात असल्याचे पहाण्यात आल्यावर सैनिकांनी त्यांना रोखले असता तस्कर आणि स्थानिक लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. (बंगालमध्ये ममता(बानो) शासनाने मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी गोतस्करांना अभय दिले आहे. त्याचेच हे फलित होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गायी तस्करीसाठी नव्हे, तर येथील बाजारात नेण्यात येत होत्या आणि नेणारे तस्कर नव्हते, तर गायीचा व्यवसाय करणारे होते. (तस्करांना साहाय्य करणार्या अशा नागरिकांनाही कारागृहात डांबायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात