Menu Close

बंगालमध्ये मंदिराजवळ गोमांस शिजवण्यास विरोध केल्यावरून धर्मांधांकडून हिंदूची हत्या

दादरीवरून जगभर रान पेटवणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, प्रसारमाध्यमे आणि पुरोगामी आता कुठे लपून बसले आहेत ?

ममता बॅनर्जी यांच्या बंगालमध्ये हिंदू असुरक्षित !

कोलकाता : शांतीपूर येथे वैष्णव मंदिराजवळ मद्यपान करणार्‍या आणि गोमांस शिजवणार्‍या धर्मांध युवकांना एका हिंदु व्यापार्‍याने विरोध केल्याने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हे मंदिर भक्ती मार्गातील श्री चैतन्य देव यांचे शिष्य अद्येता यांचे समाधीस्थळ आहे.
या मंदिराजवळ २५ डिसेंबर या दिवशी १५ जणांच्या धर्मांध युवकांनी मद्यपान करून गोमांस शिजवण्यास प्रारंभ केला, तसेच कर्णकर्कश संगीत लावून आणि आपापसात शिवीगाळ करून तेथील शांती आणि पवित्रता भंग करण्याचा प्रयत्न केला. हे बघून शांतीपूर येथील सुकांतापल्ली भागात रहाणार्‍या हिंदु तरुणांच्या एका गटाने या धर्मांधांना विरोध केला. त्याच वेळी गुरुपद विश्‍वास नावाचा एक व्यापारी तेथून जात होते. त्यांनी या भांडणात हस्तक्षेप करून धर्मांध युवकांना हिंदूंच्या मंदिराजवळ मद्यपान करणे आणि गोमांस शिजवणे याविषयी जाब विचारला. तेव्हा धर्मांध युवकांनी त्यांच्यावर काठ्यांनी आक्रमण केले. विश्‍वास भूमीवर बेशुद्ध होऊन पडले. त्यानंतर या युवकांनी त्यांना एका झाडाजवळ ओढून नेले. विश्‍वास यांच्या शेजार्‍यांनी पोलीस ठाण्यात दूरध्वनी केला. त्यानंतर ५ पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांना बघून धर्मांध युवकांनी पोबारा केला. विश्‍वास यांच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने त्यांना शांतीपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना कृष्णानगर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी अरमान शेख आणि राजा शेख या दोन धर्मांधांना अटक केली असून या टोळीचा सूत्रधार अबू शेख याच्यासह अन्वर शेख आणि चंद शेख यांचा पोलीस शोध घेत आहेत. (धर्मांधांनी अशा क्रूर पद्धतीने हिंदूंच्या हत्या केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आय.एस्.आय.एस्.चा देशात शिरकाव झाला काय किंवा नाही झाला काय, परिस्थितीत काहीच वेगळेपणा नाही. – संपादक)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *