-
धर्मरक्षणासाठी कृतीशील होणार्या धर्मशिक्षणवर्गातील महिलांचे अभिनंदन !
-
हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी महिलांच्या प्रबोधनाचा परिणाम !
सानपाडा : येथील सेक्टर ४ मधील शिव त्रिवेणी गॅलेरिया या इमारतीत जिन्यामधील कोपर्यांमध्ये हिंदु देवतांची चित्रे असणार्या फरशा धर्मशिक्षणवर्गातील महिलांच्या प्रबोधनानंतर काढून टाकण्यात आल्या. (आज धर्मशिक्षणाच्या अभावीच लोकांकडून जिन्यात देवतांच्या फरशा लावण्याची कृती होते. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे. – संपादक) अधिवक्ता सौ. पूनम चव्हाण यांनी प्रबोधन करतांना विषय मांडला. त्यांच्या समवेत धर्मशिक्षणवर्गातील सौ. मनीषा खैरे, सौ. पूनम जाधव, सौ. कविता बोराडे याही सक्रीय सहभागी झाल्या होत्या. सौ. स्वाती सणस यांनी सर्वांना संघटित करण्यासाठी प्रयत्न केले.
जिन्यात कुणी थुंकू नये, यासाठी फरशा लावल्या असल्याचे येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्या महिलांना समजताच त्यांनी गॅलेरिया येथील व्यवस्थापनाशी संबधित श्री. सानप आणि श्री. सालियन यांची भेट घेतली. देवतांच्या फरशा लावण्यातून देवतांचे विडंबन कसे होते, यासंदर्भात सांगून फरशा काढून टाकण्याची विनंती केली. त्या दोघांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला; मात्र तेथील महिलांनी प्रारंभी विरोध दर्शवला. धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी प्रबोधन केल्यावर त्या महिलांनीही फरशा काढण्यासाठी होकार दिला. त्यानुसार २ आठवड्यानंतर जिन्यातील फरशा काढण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात