भारतात जिहादी आतंकवाद्यांना शासन अशी शिक्षा कधी देणार ?
तेहरान – शियाबहुल इराणने २० सुन्नीपंथीय आतंकवाद्यांना फाशी दिली. हे आतंकवादी अनेक हत्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या सूत्रावर दोषी आढळले होते. वर्ष २००९ ते २०११ या कालावधीत सुन्नीपंथियांवर महिला आणि मुले यांच्या हत्येचा आरोप होता. तो सिद्ध झाल्यामुळे ही कारवाई केल्याचे इराण सरकारचे म्हणणे आहे.
इराणमध्ये तावाहिद आणि जिहाद नावाची संघटना अस्तित्वात आहे. अनेक आक्रमणांत या संघटनेचा हात आहे. तावहिद गटाचे सदस्य असलेल्या दोषींना ही शिक्षा झाल्याची माहिती सरकारी अधिवक्ता मोहंमद जावेद माँटाझेरी यांनी इराणी टीव्हीवरून दिली.इराणमध्ये गेल्या वर्षी ९७७ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती, असा दावा मानवी हक्क संघटनेने केला आहे. मृत्यूदंडाच्या शिक्षेची कार्यवाही करणारा इराण हा दुसरा देश आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी १ सहस्र जणांना मृत्यूदंड देण्यात आला होता. इराणनंतर पाकिस्तानने ३२६, तर सौदी अरबियाने १५८ जणांना फाशी दिली आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात