Menu Close

‘आयएस’च्‍या दहशतवाद्‍याला कुवैतमध्‍ये अटक

isis_recruiter

कुवैत : भारताने दिलेल्‍या सूचनांच्‍या आधारे कुवैतच्‍या सुरक्षा एजन्‍सीने टेरर फंडिंग आणि रिक्रूटमेंट करणार्‍या आयएसचा दहशतवादी अब्‍दुल्‍ला हादी अब्‍दुलअल ईनीजीला अटक केली आहे. सुरक्षा एजन्‍सीच्‍या माहितीनुसार, २००३ मध्‍ये ईनीजी हा पाकिस्‍तानात गेला होता. तेथून तो भारतात परतला. भारतात त्‍याने टेरर फंडिंग आणि रिक्रूटमेंटचे काम करु लागला. भारताने कुवैतसह इतर देशांना याबद्‍दल माहिती दिली होती. त्‍यानुसार, कुवैत सरकारने कारवाई करत दहशतवादी अब्‍दुल्‍ला हादी अब्‍दुलअल ईनीजी याला अटक केली.

सुरक्षा एजन्‍सीने दिलेल्‍या रिपोर्टनुसार, दहशतवादी ईनीजीने आयएस मध्‍ये सहभागी होण्‍यासाठी अरीब मजीद आणि त्‍याच्‍या तीन साथीदारांना आर्थिक मदत केली होती. सीरियाला जातानाच अरीब आणि त्‍याच्‍या साथीदारांकडील पैसे संपले होते. यानंतर त्‍यांनी इसिसचा अफगाणी हॅण्‍डलर अब्‍दुल रहमान दलौती याच्‍याकडे मदत करण्‍याची विनंती केली. यानंतर अरीब मजीजसह त्‍याच्‍या साथीदारांना वेस्‍टर्न युनियनच्‍याद्‍वारे १००० यूएस डॉलर पाठवण्‍यात आले. त्‍यानंतर मजीदच्‍या तीन साथीदारांपैकी एकजण सीरियामध्‍ये मारला गेला. त्‍याचे इतर दोन साथीदार सीरियामध्‍येच असण्‍याची शक्‍यता कुवैत सरकारने वर्तवली आहे.

संदर्भ : पुढारी

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *