Menu Close

लष्कर-ए-इस्लाम संघटनेने हिंदूंना काश्मीर सोडण्याची धमकी देणारी भित्तीपत्रके लावली !

पीडीपी-भाजपच्या राज्यात काश्मीरमधील हिंदूंची दयनीय स्थिती !

श्रीनगर : लष्कर-ए-इस्लाम या संघटनेने काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोर्‍यातून निघून जावे अथवा मरण्यास सिद्ध व्हावे, अशा मजकुराची भित्तीपत्रके लावली आहेत. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून ते चौकशी करत आहेत. ही भित्तीपत्रके दक्षिण काश्मीरमधील हाल-पुलवामामध्ये लावण्यात आली आहेत. येथे ७-८ जुलैला विस्थापित काश्मिरी पंडित कर्मचार्‍यांच्या घरांवर देशद्रोह्यांनी दगडफेक केली होती. तसेच येथील हिंदूंच्या रिकाम्या घरांना आग लावली. या वेळी ६०० हिंदूंनी येथून पलायन केले होते.

या भित्तीपत्रकांत पुढे म्हटले आहे की, काश्मीला इस्रायल बनवू पहाणार्‍या आणि काश्मिरी मुसलमानांची हत्या करण्याचा विचार करणार्‍या काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये कोणतीही जागा नाही. तुम्ही तुमची सुरक्षा दुप्पट-तिप्पट करून घ्या; तरीही तुम्ही मरण्यासाठी सिद्ध रहा.
लष्कर-ए-इस्लामी ही जिहादी संघटना बरेलवी आणि शिया मुसलमानांनाही शत्रूू समजते. २००४ मध्ये ही संघटना पाकच्या खैबर भागात सक्रीय होती. मार्च २०१५ मध्ये तिने तहरीक-ए-तालिबानबरोबर हातमिळवणी केली. या संघटनेचे काश्मीरमधील नेतृत्व क्यूम नजार नावाचा आतंकी करत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *