मुंबई येथे महापौर आणि प्रशासन यांना निवेदन !
मुंबई : महापौर सौ. स्नेहल आंबेकर आणि उपजिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत थोरात यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेच्या अंतर्गत ३ ऑगस्ट या दिवशी निवेदन देण्यात आले. प्लास्टिकच्या ध्वजांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
महानगरपालिकेच्या शाळांमधून याविषयी प्रबोधन व्हावे, यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन सौ. आंबेकर यांनी या वेळी दिले. शिवप्रतिष्ठानचे श्री. संदेश देवळे, हिंदू राष्ट्रसेनेचे श्री. भालचंद्र गायकवाड, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि सनातनचे संस्थेचे श्री. मिलिंद पोशे या वेळी उपस्थित होते.
पनवेल येथे नायब तहसीलदारांना निवेदन
पनवेल : येथील नायब तहसीलदार श्रीमती कल्याणी कदम यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच बालभारतीच्या ४ थीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या गळाभेटीचे चित्र छापून चुकीचा इतिहास पाठ्यक्रमात सामाविष्ट करणार्यांवर कारवाई करावी आणि अफझलखानवधाच्या चित्राचा समावेश करण्यात यावा, असेही निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विलास शांताराम सुर्वे आणि विलास नरहर पुंडले हे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात