देहली येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन
देहली : काश्मीरला आतंकवादमुक्त करण्यासाठी केंद्रशासनाने हिंसाचार माजवणार्या देशद्रोही काश्मिरी धर्मांधांवर थेट कारवाई करावी आणि आतंकवादाच्या विरोधात सैन्याला सर्वाधिकार द्यावेत, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाजप, वैदिक उपासना पीठ, युवा एकता मंच, रणरागिणी शाखा, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांसह माजी नौदल सैनिक आणि अनेक राष्ट्राभिमानी नागरिक उपस्थित होते.
आंदोलनातील मागण्या
१. आतंकवादाचे समर्थन करणार्या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.
२. सैन्यावर दगडफेक करणारे, आतंकवाद्यांचे समर्थन करणारे आणि देशविरोधी घोषणा देणारे यांच्यावर कठोर कारवाई करावी.
३. देशविरोधी घोषणा देणार्या मशिदींवरील भोंगे तात्काळ काढण्यात यावेत, तसेच त्या मशिदींवरही कारवाई करण्यात यावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात