हासन (कर्नाटक) : सनातनवर खोटे आरोप करून त्याचे राष्ट्ररक्षणाचे आणि धर्मजागृतीचे कार्य दडपण्याचा प्रयत्न विरोधकांकडून चालू आहे; मात्र त्यामुळे सनातनचे कार्य आणखीनच वाढणार आहे, असे उद्गार कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी. यांनी येथे काढले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकच्या हासन येथे आयोजित केलेल्या हिंदू संघटन मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा आणि रणरागिणी शाखेच्या सौ. सुमा मंजेश यांनीही संबोधित केले. मेळाव्याला २७५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
अंधश्रद्धा विरोधी विधेयकामागे हिंदु धर्म विरोधकांचा हात ! – मोहन गौडा
कर्नाटक राज्य सरकार हिंदु परंपरा, संस्कृती, धार्मिक विधी यांवर गदा आणून कायद्याने ते नष्ट करू पहात आहे. हे विधेयक संमत करण्याच्या कटामध्ये काही बुद्धीवादी, निधर्मी आणि हिंदुद्वेष्टे यांचा समावेश आहे.
स्त्री शक्ती संघाच्या सौ. विमला यांनी १०० हून अधिक महिला कार्यकर्त्यांना हिंदू संघटन मेळाव्याला आणले होते. त्यांनी कार्यक्रमाला आर्थिक साहाय्यही केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात