Menu Close

एका विवाहित धर्मांधाने हिंदु युवतीला पळवून नेल्याने फोंडा येथे तणाव !

  • वशीकरणाला बळी पडलेल्या हिंदु युवतीचा घरी येण्यास नकार !

  • कायद्याने हात बांधले असल्याने पोलिसांचे असहकार्य : पालक हतबल !

  • संतप्त हिंदूंचा दिवसभर पोलीस ठाण्याला गराडा !

हिंदूंनो, सनातन गेली काही वर्षे सांगत असलेला लव्ह जिहाद तो हाच ! आतातरी जागे व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

Love_jihad_M

फोंडा : कुर्टी, फोंडा येथील एका प्रतिष्ठित हिंदु कुटुंबातील २९ वर्षीय युवती लव्ह जिहादला बळी पडली आहे. एका पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या विवाहित, तसेच मुलांचा बाप असलेल्या धर्मांधाने पळवून नेऊन या मुलीशी निकाह केला आहे. तीन दिवसांपूर्वी हुब्बळीला पळून गेलेल्या या दोघांना परत आणण्यास फोंडा पोलिसांना यश आले असले, तरी धर्मांधाच्या वशीकरणाला बळी पडलेल्या या युवतीने पालकांसोबत येण्यास नकार दिला आहे. कायद्याने हात बांधले असल्याने पोलिसांनी सहकार्य करण्यास नकार दिल्यामुळे पालक हतबल बनले आहेत. एका हिंदु युवतीला पळवल्यामुळे आणि पोलिसांच्या असहकार्यामुळे संतप्त बनलेल्या हिंदूंनी दिवसभर पोलीस ठाण्याला गराडा घातला होता.

हा धर्मांध गेली ७ वर्षे पळवून नेलेल्या मुलीच्या वडिलांच्या परिचयाचा होता. त्याचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. (हिंदूंनो, धर्मांधांना आपल्या घरी येऊ द्यायचे का ? त्यांच्यावर किती विश्‍वास ठेवायचा याचा आतातरी विचार करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
आम्ही मुलीला बरेच समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र मुलगी पालकांसोबत जाण्यास सिद्ध नाही. मुलगी सज्ञान आहे, तिच्या इच्छेशिवाय आम्ही तिला पालकांसोबत पाठवू शकत नाही, असे पोलीस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी सांगितले.

माझ्या मुलीला वाचवा ! – मुलीची आई

आमचा विश्‍वासघात करून या धर्मांधाने माझ्या भोळ्या मुलीला फसवले आहे. त्याची दुबई येथे एक बायको आहे. तो माझ्या मुलीला दुबई येथे नेऊन वेश्याव्यवसायासाठी विकेल. माझ्या मुलीला वाचवा. पोलीस आम्हाला साहाय्य न करता. त्या धर्मांधाला पाठीशी घालत आहेत. आज मला भोगावे लागत आहे, उद्या सर्व हिंदूंवर अशी पाळी येऊ शकते, अशी संतप्त प्रतिक्रिया मुलीच्या आईने पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. मुलीची आई एक लोकप्रतिनिधी आहे.

हिंदूंनी धर्मांधाच्या सहकार्‍यांना चोपले !

धर्मांधासोबत आलेले अन्य ३ धर्मांध स्थानिक हिंदूंच्या हातात सापडल्यानंतर संतप्त हिंदूंनी या धर्मांधांना पोलीस ठाण्यासमोरच चोपले. धर्मांध ज्या वाहनाने पोलीस ठाण्यात आला होता त्या वाहनाची तोडफोड करण्यासाठी हिंदु युवक पुढे सरसावले होते; मात्र मुलीच्या वडिलांनी सर्वांना शांत रहाण्याचे आवाहन केले.

संतप्त हिंदूंच्या बाजूने बोलण्याचे नाटक करणारे काही हुशार धर्मांध !

संतप्त हिंदूंच्या आक्रमकतेमुळे घाबरलेले काही धर्मांध मुलीच्या वडिलांच्या बाजूने बोलत होते. हे धर्मांध लव्ह जिहाद केलेल्या युवकाच्या विरोधात बोलत होते; मात्र त्यांचा हा साळसूदपणा दिसत होता. बरेच धर्मांध या युवकाला पाठिंबा देण्यासाठी जमले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *