देहली : स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे १ ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात येत आहे. या चळवळीला पोलीस, प्रशासन, वृत्तपत्रे तसेच राष्ट्रप्रेमी नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या अंतर्गत १ ऑगस्ट या दिवशी आग्य्रातील अप्पर शहर दंडाधिकारी योगेंद्र कुमार यांना निवदेन सादर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ३ ऑगस्ट या दिवशी येथील जिल्हाधिकार्यांकडून एक पत्रक काढून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर प्रतिबंध घालण्याचा आदेश देण्यात आला.
महाविद्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी प्रबोधन !
आग्रा येथील सरस्वती शिशु मंदिर तसेच सी.ए. अंतिम वर्षाचा शिकवणी वर्ग या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनुक्रमे श्रीमती मोनिका सिंह आणि श्री. ठाकूर सिंह यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर प्रबोधन केले. येथील वृत्तपत्रांनी समितीच्या या चळवळीला व्यापक प्रसिद्धी दिली.
हिंदु जनजागृती समितीकडून नोएडा येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून नोएडा येथील जिल्हाधिकारी बच्चू सिंह यादव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या वतीने त्यांच्याकडे राष्ट्रध्वजाच्या अवमानाविषयी एक ध्वनिचित्रतबकडीही (व्हीसीडीही) सोपवण्यात आली. या वेळी समितीचे श्री. अरविंद गुप्ता, कु. किरण महतो आणि श्रीमती स्नेहलता यादव उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात