Menu Close

खार (मुंबई) येथील महिला पत्रकारितेचा विनयभंग आणि तिला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक

धर्मांधाच्या या कृत्याच्या निषेधार्थ पत्रकार संघटना संघटितपणे आवाज उठवणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

rapeमुंबई : खार येथील दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या पत्रकार कु. भाग्यश्री ठाकूर यांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध रफिक शेख (वय ३५ वर्षे) याला अटक केली आहे. (उद्दाम धर्मांधांना कायदा-सुव्यव्थेचा काहीच धाक राहिला नसल्याचे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. कु. भाग्यश्री ठाकूर या पशुकल्याण संस्थेच्या सदस्याही आहेत. पाळीव कुत्र्यास २ ऑगस्ट या दिवशी त्या सकाळी बाहेर फिरायला घेऊन जात होत्या. कुत्र्याने शेजारी रहाणारे रफिक शेक यांच्या घरासमोर मलमूत्र विसर्जन केले.

२. याचा राग येऊन धर्मांध रफिक शेख याने कु. भाग्यश्री हिला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला.

३. कु. भाग्यश्री यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन अधिक चौकशी आरंभली आहे.

खार परिसरात धर्मांधांकडून हिंदु युवती आणि स्त्रिया यांंच्या छेडछाडीच्या घटनांत वाढ !

वाढत्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी सरकार तत्परतेने पावले उचलणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

येथील गोळीबार मार्ग परिसरात धर्मांधांकडून हिंदु युवती आणि स्त्रिया यांची छेडछाड करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हिंदु युवतींचा बळजोरीनेे हात पकडून तिला दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न करणे, अश्‍लील भाषेत शिवीगाळ करणे, बळजोरीनेे सेल्फी काढणे, असे प्रकार राजरोजसपणे होत आहेत. यापूर्वी एका १४ वर्षीय हिंदु मुलीचा धर्मांधाने तोंड दाबून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. हिंदु युवतींची छेडछाड करणे, हा तेथील मुसलमान युवकांचा दिनक्रम झाला आहे. अशा प्रकारांमुळे येथील हिंदु युवती आणि पालकवर्ग यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पीडितांकडून अनेक वेळा पोलिसांत तक्रारही केली जात नाही. धर्मांधांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे प्रविष्ट आहेत; मात्र पोलिसांकडून कोणतीही कठोर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे धर्मांधांकडून छेडछाडीचे प्रकार चालूच आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *