भुवनेश्वर (ओडिशा) येथे एक भारत अभियान – कश्मीरकी ओर चळवळीच्या अंतर्गत जाहीर सभा
भुवनेश्वर (ओडिशा) : काश्मीर हे भारताचे प्रवेशद्वार आहे. आज पाकसमर्थित काश्मीरच्या आझादीची (मुक्ततेची) चळवळ चालू आहे. तेथील हिंदूंना २६ वर्षांपूर्वी हाकलून लावण्यात आले. आता काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. पाकिस्तान मुसलमानांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच हसके लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्थान अशी घोषणा दिली. त्यांनी भारताविरुद्ध ४ युद्ध लढली. लढूनही हिंदुस्थान मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर घुसके लेंगे हिंदुस्थानची रणनीती आखली आहे. त्यामुळे आज काश्मीर संकटात आहे. काश्मीरचे रक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी तेथे हिंदू असणे महत्त्वाचे आहे. काश्मीर वाचले, तरच भारत वाचेल, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. भुवनेश्वर येथे भारत रक्षा मंच आणि हिंदु जनजागृती समिती यांनी एक भारत अभियान – कश्मीरकी ओर चळवळीच्या अंतर्गत आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांच्यासह ११ राज्यांतील हिंदु संघटनांचे पदाधिकारी आणि २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
एक भारत अभियान काश्मिरी हिंदूंसाठी दिलासादायक ! – डॉ. अजय च्रोंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर
संपूर्ण विश्वात धर्माच्या आधारावर एवढा मोठा वंशविच्छेद कुठेच झाला नसेल. ज्यूंचा वंशविच्छेद करणार्या हिटलरलाही लाजवेल, असा वंशविच्छेद इस्लामने भारतात हिंदूंचा केला. काश्मिरी हिंदू याच वंशविच्छेदाचा एक अध्याय आहे. आज काश्मीरमधील स्थिती अत्यंत स्फोटक आहे. काश्मीरमधील शासन फुटीरतावाद्यांना मिळालेले आहे आणि केंद्रातील शासन आमचे ऐकून घ्यायला सिद्ध नाही. वर्ष २०१४ मध्ये देशात राष्ट्रवादी शासन आले, त्यामुळे आशेचा किरण निर्माण झाला होता; पण केंद्रातील नव्या शासनाने काश्मिरी हिंदूंचा भ्रमनिरास केला. कुठलेच शासन हिंदूंच्या हिताचे कार्य करत नसल्याने हिंदु संघटनांना एकत्रित यावे लागत आहे. एक भारत अभियान या उपक्रमामुळे मोठी जागृती मात्र होईल. या उपक्रमाद्वारे जो प्रतिसाद मिळत आहे, तो काश्मिरी हिंदूंसाठी दिलासादायक आहे.
केवळ काश्मीरच नाही, तर तमिळनाडूपर्यंत सर्वत्र जिहादचा धोका ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष)
ज्या दिवशी इराक आणि सिरीया या देशांमध्ये इसिस स्थापन झाली, त्याच दिवशी रामेश्वरम्मध्ये मुसलमानांनी इसिसचा झेंडे असलेले टी-शर्ट घालून इसिसचे स्वागत केले. त्यामुळे केवळ काश्मीरच नाही, तर तामिळनाडूपर्यंत सर्वत्र जिहादचा धोका स्पष्ट दिसत आहे. आम्ही तामिळी असलो, तरी हिंदु आहोत आणि काश्मिरी हिंदू आमचे धर्मबंधू, संस्कृतीबंधू आणि राष्ट्रबंधू आहेत. त्यांचे रक्षण, हे आमचे कर्तव्य आहे.
१९ जानेवारी २०१७ ला चलो कश्मीर चळवळीत सहभागी व्हा ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
एक भारत अभियान हे काश्मिरी हिंदूंना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आहे. भारतभरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन काश्मीरमधील हिंदूंशी आपले बंधुत्वाचे नाते आहे, या दृष्टीकोनातून एक भारत अभियानास आरंभ केला आहे. यात ओडिशा राज्यातील हिंदूंचाही सहभाग आवश्यक आहे; कारण भारतातील दोन सूर्यमंदिरांपैकी एक सूर्यमंदिर ओडिशातील कोणार्क येथे आहे, तर दुसरे मार्तंड मंदिर काश्मीरमधील अनंतनाग येथे भग्नावस्थेत आपल्या सर्वांना साद घालत आहे. चलो कश्मीर ही चळवळ काश्मिरी हिंदूंवरील उपकार नसून देशभरातील हिंदूंचे विस्थापन रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. यासाठी १९ जानेवारी २०१७ ला चलो कश्मीर चळवळीत सहभागी व्हा.
संविधानातील ३७० कलम हटवणे, हाच काश्मिरी हिंदूंना न्याय देण्याचा उपाय ! – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वोच्च न्यायालय
वर्ष १९५७ मध्ये काश्मीरची संविधानसभा विसर्जित झाली असल्याने आता ३७० कलम देशाचे राष्ट्रपती अधिसूचना काढून रहित करू शकतात; मात्र देशाचे न्यायधुरीण आणि संविधानाचे अभ्यासक याविषयी मत व्यक्त करत नाहीत. सर्वपक्षीय राज्यकर्ते कलम ३७० विषयी दिशाभूल करतात की, काश्मीरच्या रचनेत काही परिवर्तन हवे असेल, तर तेथील विधानसभेत दोन तृतीयांश बहुमताचा पाठिंबा असायला हवा. विद्यमान व्यवस्थेत काश्मिरी हिंदूंना न्याय मिळू शकत नाही. संविधानातील ३७० कलम हटवणे, हाच त्यावरील रामबाण उपाय आहे.
अफझलखानाला चिरणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत ! – अधिवक्ता देवदास शिंदे, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान, पुणे
आम्ही काश्मीर पुन्हा कधी मिळवणार ? हिंदु भारतात अल्पसंख्यांक झाल्यानंतर कि भारतात ठिकठिकाणी काश्मीर बनल्यानंतर ? हिंदूंचा वंशविच्छेद, ही एकमात्र योजना घेऊन जिहादी कार्यरत आहेत. अशांना उत्तर द्यायचे असेल, तर १९ जानेवारीला भारताच्या प्रत्येक घरातून १ हिंदु काश्मीरमध्ये एक भारत अभियान – कश्मीरकी ओर चळवळीत सहभागी झाला पाहिजे. आम्हाला काश्मिरी हिंदूंचे पुनवर्सन करायचे आहे. केवळ एवढ्यावरच थांबून उपयोग नाही, तर पाकने व्यापलेले काश्मीर आणि ज्या सिंधू नदीमुळे हिंदु ओळखले जातात, ती सिंधू नदी परत मिळवायची आहे. गंगा पृथ्वीवर आणणार्या भगीरथाचे आम्ही वंशज आहोत, हे पाकने लक्षात घेतले पाहिजे. घरघर अफझल होंगे, अशा घोषणा आम्हा मराठ्यांना सांगू नयेत; कारण अफझलखानाला चिरणार्या शिवछत्रपतींचे आम्ही वंशज आहोत. दूध मागोंगे तो खीर देंगे । कश्मीर मागोंगे तो चीर देंगे ।, या घोषणा देण्याचा आम्हाला अधिकार आहे.
काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन होणे, हा भारतात हिंदु राष्ट्र निर्मितीचा पहिला टप्पा ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंना हाकलून लावण्यात आले, तेव्हा जिहाद्यांनी काश्मीरमध्ये निझामे मुस्तफाची घोषणा केली होती. निझामे मुस्तफा म्हणजे इस्लामी शासन अर्थात् आजच्या भाषेत इस्लामिक स्टेट ! भारतात २६ वर्षांपूर्वी काश्मीरला हिंदूविहीन करून इस्लामिक स्टेटचा आरंभ झाला होता. आज सर्रास काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकतात. हळूहळू हे लोण भारतात पसरू नये, यासाठी एक भारत अभियान महत्त्वाचे आहे. भारताला निर्णय घ्यायचा आहे की, भारतभर इस्लामिक स्टेट हवे कि हिंदु स्टेट म्हणजे हिंदु राष्ट्र हवे ? भारतात इस्लामिक स्टेट आणणे रोखायचे असेल, तर काश्मिरमध्ये हिंदूंची पुनर्वसन होणे महत्त्वाचे आहे. भारता हिंदु राष्ट्र निर्मितीचा हा पहिला टप्पा ठरेल !
काश्मिरी हिंदूंचा वनवास संपवण्यासाठी पुढाकार घ्या ! – टी.एन्. मुरारी, शिवसेनाप्रमुख, तेलंगण आणि आंध्रप्रदेश
श्रीराम आणि पांडव यांना १४ वर्षे वनवास भोगावा लागला; पण नंतर त्यांना धर्मराज्य प्राप्त झाले. काश्मिरी हिंदूंचा वनवास कधी संपणार आहे ? काश्मिरी हिंदूंचे २६ वर्षांचे विस्थापन म्हणजे वनवास आहे. आपल्या सर्वांना तो संपवण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे.
काश्मिरी हिंदूंना त्यांचा न्याय्य अधिकार द्या ! – श्री. मुरली मनोहर शर्मा, सहसंयोजक, भारत रक्षा मंच
जिहाद्यांनो, लक्षात घ्या, हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. काश्मिरी हिंदूंना त्यांचा न्याय्य अधिकार द्या ! जेव्हा हिंदू संघटित होतात, तेव्हा त्यांच्या बाहूंमध्ये बळ संचारते आणि तासाभरात बाबरीचा ढाचा पडतो. एकीकडे एम्आयएम्चे ओवैसी म्हणतात, १५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला हटवा. आम्ही १०० कोटी हिंदूंना भारी पडू ! दुसरीकडे गुजरातमध्ये पोलीस १५ मिनिटे विलंबाने पोचले; म्हणून मुसलमानांवर अत्याचार झाले, असे तेथील मुसलमान टाहो फोडतात. त्यामुळे हिंदूंच्या सहनशीलतेचा आदर करा !
क्षणचित्रे
१. सभेनंतर सुप्रसिद्ध कवी श्री. गजेंद्र सोलंकी आणि सरदार प्रताप फौजदार यांनी वीररसपूर्ण काव्याचे गायन केले.
२. या प्रसंगी भारत रक्षा मंचचे संयोजक श्री. सूर्यकांत केळकर यांनी बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येविषयी उपस्थितांना माहिती दिली.
३. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदाचा विदारक अनुभव घेतलेल्या सौ. अर्चना काक यांनी आपले मनोगत मांडले, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात