बेंगळुरू (कर्नाटक) येथील हिंदूसंघटन मेळावा
बेंगळुरू (कर्नाटक) : साम्यवाद्यांचे धर्मावरील आक्रमण धर्मशक्तीमुळे रोखू शकलो. साम्यवादी तत्त्वप्रणालीमुळे हिंदु धर्माची फार मोठी हानी झाली आहे. साम्यवाद्यांनी आतापर्यंत २५ लाख २० सहस्र लोकांची हत्या घडवून आणली आहे, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. विवेक सिंह यांनी बेंगळुरू येथे आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात बोलतांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील द्वारका परिषद सभागृहामध्ये नुकताच हिंदूसंघटन मेळावा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
धर्मरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे ! – ज्योतिषी रमेश शर्मा गुरुजी
विद्या धन हे अन्य धनांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे आपल्या धर्मग्रंथात म्हटले आहे; पण आपण नवीन पिढीला काय शिकवत आहोत ? आपली संस्कृती आणि परंपरा शिकवणार्या शाळा सोडून त्यांना आपण पाश्चात्त्य संस्कृती शिकवणार्या शाळांमध्ये घालतो. धर्मावर आघात झाल्यावर त्या विरोधात केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरतात; मात्र सामान्य लोक त्यापासून लांब रहातात. आता धर्मरक्षण करणेे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
संघटित होऊन समाजातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवा ! – श्री. मोहन गौडा
सध्या धर्मांतर, गोहत्या, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, भ्रष्टाचार, आतंकवाद इत्यादी समस्या देशाला भेडसावत आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना झाली पाहिजे.
मेळाव्याला उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांना रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा यांनीही संबोधित केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात