Menu Close

हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

फलटण (जिल्हा सातारा) : वर्ष १९७६ मध्ये घटनेतील कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले; मात्र धर्मनिरपेक्ष देशात आज सर्वत्र भ्रष्टाचार, अनैतिकता, प्रतिदिन होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. हिंदूंवरील अत्याचारांतही वाढ होत असून हिंदूंचीच मंदिरे शासन कह्यात घेत आहे. हिंदू आणि अन्य धर्मीय यांच्यात दुजाभाव केला जातो. हिंदूंवरील अत्याचार वाढतच आहेत. हे रोखण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर यांनी केले. ढवळेवाडी (ता. फलटण) येथील श्रीराम मंदिरात ९ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छोट्या हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

सभेच्या प्रारंभी श्री. नीलेश सांगोलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच या वेळी वेदमंत्रपठणही करण्यात आले. श्री. सांगोलकर यांचा सत्कार ढवळेवाडी गावच्या सरपंच सौ. रवीना नेवसे यांनी केला.

क्षणचित्रे

१. सभेसाठी पटल, आसंद्या, सतरंज्या ग्रामपंचायतीने विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. तसेच ध्वनीवर्धक यंत्रणा आणि साधकांच्या जेवणाची व्यवस्था प्रणजित माने विचार मंचाने दिली.

२. सभेनंतर धर्माभिमान्यांनी राष्ट्र-धर्माच्या अनुषंगाने शंकानिरसनही करवून घेतले.

३. सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

४. सभेमध्ये केलेल्या आवाहनानुसार १३ ऑगस्ट या दिवशी ढवळेवाडी येथील ग्रामस्थ राष्ट्रध्वजाचे विडंबन होऊ नये, याविषयीचे निवेदन देण्यासाठी साखरवाडी पोलीस ठाण्यात जाणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *