पेण (रायगड) : वडखळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी यांनी जय किसान विद्यामंदिर या शाळेत राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मुलांमध्ये राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्याविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होते. मुख्याध्यापक श्री. मनोहर वाणी यांनी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ९०० विद्यार्थी आणि २४ शिक्षक यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.
हिंदु जनजागृती समितीने लावलेल्या प्रदर्शनातून गौरवशाली भारतीय संस्कृतीचा प्रत्यय !
हिंदु जनजागृती समितीने लावलेले प्रदर्शन अतिशय सुंदर आणि उपयुक्त आहे. या प्रदर्शनातून गौरवशाली भारतीय संस्कृतीचा प्रत्यय येतो. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे प्रबोधन झाले. त्यामुळे समितीला मनापासून धन्यवाद ! – सौ. प्रज्ञा महाजन
क्षणचित्र – बहुतांश विद्यार्थी फ्लेक्स फलकावरील लिखाण आपल्या वहीत लिहून घेत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात