Menu Close

राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी देशातील स्वार्थी लोकांची लोकशाही व्यवस्था हटवणे क्रमप्राप्त ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

धुळे येथे हिंदूसंघटन मेळावा

मेळाव्याला उपस्थित धर्माभिमानी

धुळे : १९४७ मध्ये भारतावर १ रुपयाचेही कर्ज नव्हते. वर्ष २०१५ च्या आकडेवारीनुसार प्रत्येक नागरिकावर २३ सहस्र २८५, म्हणजे देशावर २९ सहस्र १०६ अब्ज रुपयांचे कर्ज आहे. आज देशात ३०० हून अधिक जिल्हे संवेदनशील आहेत. देशात प्रत्येक १४ मिनिटांनी १ बलात्कार होतो. धर्मनिरपेक्षतेमुळे देशासमोर असंख्य धामिर्र्क समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतातील हिंदूंची मोठमोठी मंदिरे निधर्मी सरकारने कह्यात घेतली आहेत, तर मशिदींसाठी मात्र स्वतंत्र वक्फ बोर्ड आणि चर्चसाठी डायोसेशन सोसायटी असते ! हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदु धर्मासाठी नव्हे, तर मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी वापरला जातो. राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी देशातील स्वार्थी लोकांची लोकशाही व्यवस्था हटवणेच क्रमप्राप्त आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले.

७ ऑगस्ट या दिवशी धुळे येथे झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला १५० धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश श्री. श्रेयस पिसोळकर यांनी वाचून दाखवला, तर महर्षींनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेला संदेश श्री. प्रशांत जुवेकर यांनी वाचला. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची काही प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. सप्तर्षि जीवनाडीतील राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे मार्गदर्शन आणि सनातनपर बंदीका वार पुन: एक बार या दोन्ही ध्वनीचित्रचकत्या दाखवण्यात आल्या.

स्वतःसमवेत समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वयंसिद्ध व्हा ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

समाजच असुरक्षित असेल, तर व्यक्ती सुरक्षित कशी असणार ? राष्ट्र सुरक्षित असल्याविना समाज सुरक्षित राहू शकत नाही. तसेच धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे; म्हणून धर्म सुरक्षित असल्याविना राष्ट्रही सुरक्षित राहू शकत नाही. थोडक्यात, स्वतःचे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर नागरिकांनी स्वयंसिद्ध होण्याविना पर्याय नाही !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *