Menu Close

शरीर आणि मन प्रतिकारक्षम बनवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – मोनिका गावडे

व्याख्यानाला उपस्थित हिंदू

खंडाळा (जिल्हा सातारा) : स्वसंरक्षण म्हणजे स्वतःचे रक्षण करणे होय. सध्या समाजात गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या दुष्प्रवृत्ती समाजावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच त्या सामर्थ्यवान बनल्या आहेत. आपल्यासह समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्यासाठी आपण आपले शरीर आणि मन सातत्याने प्रतिकारक्षम ठेवायला हवे. त्यासाठी सर्वांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून सिद्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या पुणे जिल्हा समन्वयक कु. मोनिका गावडे यांनी केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी येथील भैरवनाथ मंदिरात हिंदु संघटन आणि महिला सक्षमीकरण या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. स्वतःच्या अस्तित्वासाठी कुटुंब, घर, वसाहत, गाव, समाज, राष्ट्र आणि धर्म यांचीही आवश्यकता असते. या सर्वांचे रक्षण झाले, तरच खर्‍या अर्थाने स्वरक्षण होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी १०५ हून अधिक हिंदू उपस्थित होते. या वेळी उपस्थित हिंदूंनी प्रत्येक मासात (महिन्यात) धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. कार्यक्रमाच्या आयोजनात सर्वश्री तुषार अष्टेकर, सुरज साळुंखे, अभिजित पवार, गौरव पवार, तसेच सौ. माधवी जवळकर आणि कु. मनाली गाढवे यांचा सक्रीय सहभाग होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *