केरळमधील हिंदूंची दैनावस्था !
असे दिशाहीन आणि विचारांची सुस्पष्टता नसणारे उपप्राचार्य विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे काय देणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोची (केरळ) : राष्ट्रध्वजाचा मान राखा या हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेच्या अंतर्गत येथील कदावंथारा येथील केंद्रीय विद्यालयात समितीचे एक कार्यकर्ता गेले होते. या वेळी कार्यकर्त्याने विद्यालयाच्या उपप्राचार्यांची भेट घेऊन त्यांना मोहिमेची माहिती दिली, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये या विषयी माहिती देणारे समितीचे भित्तीपत्रक (पोस्टर) विद्यालयात लावण्याची विनंती केली. यावर उपप्राचार्यांनी सदर भित्तीपत्रकावर हिंदु जनजागृती समिती असे नाव लिहिले असल्याने ते लावण्यास नकार दिला. यावर ते म्हणाले, आमच्या विद्यालयात सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात.
यावर कार्यकर्त्याने सदर भित्तीपत्रकाचा उद्देश हा राष्ट्रहिताच्या दृष्टीने असून यात धर्माचा काही संबंध येत नसल्याचे त्यांना सांगितले. यावर उपप्राचार्य भित्तीपत्रक लावण्यासाठी सिद्ध झाले, परंतु समितीच्या नावात असलेल्या हिंदु शब्दामुळे विद्यालयात या संदर्भात व्याख्यान ठेवण्याविषयी त्यांनी असमर्थता दर्शवली. (भारतीय राष्ट्रध्वजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यास मज्जाव करणारे केंद्रीय विद्यालयाचे सदर उपप्राचार्य असणे, यासाठी हा भारत आहे की पाक ? बहुसंख्यांक हिंदूंच्या देशाची अशी स्थिती, ही हिंदूंसाठी लज्जास्पदच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात