आग्रा प्रशासनाकडून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकण्यावर बंदी !
आग्रा : हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे राष्ट्रध्वजाचा आदर राखा या अंतर्गत १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत चळवळ राबवण्यात येत आहे. याचा पोलीस, प्रशासन, वर्तमानपत्रे आणि राष्ट्रप्रेमी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आग्य्राच्या जिल्ह्याधिकारी कार्यालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकण्यावर बंदी घालणारा आदेश देण्यात आला.
१. आग्य्राचे अतिरिक्त नगर दंडाधिकारी योगेंद्र कुमार यांना प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री होऊ नये, यासाठी निवेदन देण्यात आले.
२. येथील सरस्वती शिशु मंदिरातील ६२५ विद्यार्थ्यांसमोर आणि येथील एका खाजगी शिकवणी वर्गामध्ये ६० विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रध्वजाचा आदर राखण्यासाठी समितीच्या मोनिका सिंह आणि श्री. ठाकूर सिंह यांनी व्याख्यान दिले.
३. येथील पालीवाल पार्कमध्ये चळवळ राबवण्यात आली. त्या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांकडून इंडिया राइजिंग ही सामाजिक संस्था, तसेच रिव्हर कनेक्ट या संस्थेला चळवळीविषयी माहिती देऊन जागृती केली.
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आणि वैदिक उपासना पीठ यांच्याकडून निवेदन !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – राष्ट्रध्वजाचा आदर राखण्याच्या चळवळीच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि वैदिक उपासना पीठ यांच्या माध्यमातून येथील जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या अनुपस्थितीत साहाय्यक अधिकार्यांनी त्याचा स्वीकार केला. त्यांनी या संदर्भात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या वेळी समितीचे श्री. अरविंद गुप्ता, कु. किरण महतो, वैदिक उपासना पीठचे श्री. देवेंद्र वर्मा आणि श्री. प्रभाकर द्विवेदी सहभागी होते.
फरीदाबाद (हरियाणा) येथील शाळेत राष्ट्रध्वजाचा सन्मान करा याविषयावर व्याख्यान !
फरीदाबाद (हरियाणा) : येथील एस्.जी.एम्. नगर स्थित नेहा पब्लिक स्कूलमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रध्वजाचा सन्मान करा याविषयावर व्याख्यान देण्यात आले. याचा ४० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यात राष्ट्र्रध्वजाचे महत्त्व सांगण्यासह त्याचा सन्मान का केला पाहिजे आदी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाचा वापर न करण्याविषयी सांगण्यात आले. फरीदाबाद येथील ६ शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा आदर राखण्याच्या संदर्भात समितीकडून निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात