नागपूर : आज स्त्रियांवर होणार्या अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. यामुळे स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासमवेत स्वतःची शारीरिक क्षमता वाढवणेही महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण घेतल्यानेच स्त्रियांमध्ये अत्याचाराला प्रतिकार करण्याची मानसिकता निर्माण होईल, असे प्रतिपादन १० ऑगस्ट या दिवशी येथे झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात रणरागिणी शाखेच्या सौ. नंदा खंडागळे यांनी केले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश श्री. श्रीकांत क्षीरसागर यांनी आणि महर्षींचा संदेश श्री. अतुल अर्वेन्ला यांनी वाचून दाखवला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात