केवळ पदोन्नतीसाठी स्वधर्माचा त्याग करणे, हे हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे दर्शवते ! स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्यानुसार जेव्हा एका हिंदूचे धर्मांतर होते, तेव्हा शत्रूच्या संख्येत एकाने वाढ होते, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
राजस्थानचे वरिष्ठ सनदी अधिकारी उमराव सालोदिया
जयपूर – राजस्थानचे वरिष्ठ सनदी अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारला असून खान आडनाव धारण केले आहे. ३१ डिसेंबरला स्वत: सालोदिया यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सालोदिया हे जयपूर येथील निवासी असून त्यांनी स्वत:वर भेदभाव झाल्याचा आरोप केला आहे.
पत्रकारांशी बोलतांना पूर्वाश्रमीचे सालोदिया म्हणाले, मी दलित असल्याने हिंदु धर्मात माझ्यावर अन्याय केला गेला. मला मुख्य सचिव बनवले गेले नाही. इस्लाम धर्मात असा भेदभाव नाही. भारतीय संविधानाच्या कलम २५ (१) नुसार भारतीय नागरिकाला कोणत्याही धर्माचा स्वीकार करता येतो. त्यानुसार मी धर्मांतर केले आहे. (मुख्य सचिव बनवले नाही म्हणून हिंदु धर्माचा त्याग करून इस्लामचा स्वीकार करणारे सनदी अधिकारी कोणत्या भ्रमात आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सालोदिया वर्ष १९७८ च्या तुकडीचे आयएस्आय अधिकारी असून ते ६ मासानंतर भारतीय सेवेतून निवृत्त होणार आहेत. सध्या ते राजस्थान रोडवेजचे अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी त्यांनी जवाहर कला केंद्राचे संचालक, वाहतूक आणि महसूल अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही कार्य पाहिले आहे. सालोदिया यांच्या धर्मांतराविषयी बोलतांना राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया म्हणाले, कोण कोणत्या धर्माला मानतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; परंतु सालोदिया यांची पद्धत चुकीची आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात